World Test Championship : ऑस्ट्रेलियाला खाली खेचत भारत अव्वल
क्रीडा

World Test Championship : ऑस्ट्रेलियाला खाली खेचत भारत अव्वल

ब्रिस्बेन : पाचव्या कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा तीन गड्यांनी पराभव करत बॉर्डर गावसकर कसोटी मालिका २-१नं खिशात घातली आहे. या ऐतिहासिक विजयासह भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये या तीन संघामध्ये पहिल्या दोन संघामध्ये स्थान मिळवण्याची टक्कर आहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं […]

शार्दूल-सिराजचा भेदक मारा; भारतासमोर ३२८ धावांचं आव्हान
क्रीडा

शार्दूल-सिराजचा भेदक मारा; भारतासमोर ३२८ धावांचं आव्हान

ब्रिस्बेन : शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक माऱ्यापुढे ब्रिस्बेन कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियानं २९४ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी भारतीय संघाला ३२८ धावांचे आव्हान दिले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस यांनी तुफानी फटकेबाजी […]

शार्दुल-सुंदरची धडाकेबाज खेळी; पहिल्या डावात भारताची ३३६ धावांपर्यंत मजल
क्रीडा

शार्दुल-सुंदरची धडाकेबाज खेळी; पहिल्या डावात भारताची ३३६ धावांपर्यंत मजल

ब्रिस्बेन : शार्दुल ठाकूर आणि वॉशिंगटन सुंदर यांनी सातव्या गड्यासाठी केलेल्या १२३ धावांच्या भागिदारीच्या बळावर भारतीय संघानं पहिल्या डावात ३३६ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावांत किरकोळ ३३ धावांची आघाडी मिळाली आहे. १८६ धावांवर आघाडीचे सहा फलंदाज तंबूर परतल्यानंतर भारतीय संघ २०० धावांपर्यंत मजल मारेल का? अशी शंका असताना सुंदर आणि शार्दुल ठाकूरनं जबाबदारीनं […]

दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द; तिसऱ्या दिवसासाठी पंचानी घेतला हा निर्णय
क्रीडा

दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द; तिसऱ्या दिवसासाठी पंचानी घेतला हा निर्णय

ब्रिस्बेन : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात पावसानेच बॅटिंग केली. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पंच आणि सामनाधिकाऱ्यानं आजच्या दिवसाचा खेळ थांबवला आहे. उद्या, तिसऱ्या दिवसाच्या खेळाला अर्धा तास लवकर सुरुवात करण्याचा निर्णय पंचानी घेतला आहे. दुसऱ्या दिवासाखेर भारतीय संघानं दोन गड्यांच्या मोबदल्यात ६२ धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप […]

World Test Championship : ऑस्ट्रेलिया अव्वल, तर भारत-न्यूझीलंडमध्ये टक्कर
क्रीडा

World Test Championship : ऑस्ट्रेलिया अव्वल, तर भारत-न्यूझीलंडमध्ये टक्कर

सिडनी : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारताला यापुढील कसोटी सामन्यांत विजय मिळवणं आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही भारताची पाचवी मालिका आहे. सिडनी कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी ८-८ सामने जिंकले आहेत. भारताच्या खात्यात ४०० गूण […]

पहिल्यांदाच घडलं असं काही; भारताची ऐतिहासिक कामगिरी
क्रीडा

पहिल्यांदाच घडलं असं काही; भारताची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : सिडनी कसोटी वाचवत भारतीय संघानं बॉर्डर-गावसकर मालिका १-१ बरोबरीत राखली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात ४०७ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मानं ९८, शुबमन गिल ६४, चेतेश्वर पुजारा २०५, ऋषभ पंत ११८, हनुमा विहारी १६१ आणि आर. अश्विन १३८ चेंडूचा सामना केला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेचा अपवाद वगळता सर्वच फलंदाजांनी ५० पेक्षा जास्त चेंडू खेळून […]

ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने मागितली भारतीय संघाची माफी; काय आहे प्रकरण?
क्रीडा

ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने मागितली भारतीय संघाची माफी; काय आहे प्रकरण?

सिडनी : तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रलियन क्रिकेट मंडळाने भारतीय संघाची माफी मागितली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक वाईट कृत्य भारतीय संघाबरोबर घडले होते, त्याची दिलगिरी आता ऑस्ट्रलियाच्या क्रिकेट मंडळाने व्यक्त केली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारताचे जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना काही प्रेक्षकांनी शिविगाळ केली होती. या दोघांच्या विरुद्ध […]

चौथ्या दिवसावरही ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व; तरीही भारताला विजयाची संधी
क्रीडा

चौथ्या दिवसावरही ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व; तरीही भारताला विजयाची संधी

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर सामन्यात्या ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व दिसून येत असले तरी भारतालाही विजयाची संधी असल्याचे दिसून येत आहे. भारतीय संघाने दिवसअखेर २ बाद ९८ धावांपर्यंत मजल मारली. आजच्या दिवसाच्या खेळात स्टीव्ह स्मिथ, लाबूशेन आणि ग्रीन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३१२ धावांवर डाव घोषित केला आणि भारताला मोठं आव्हान दिलं. या आव्हानाचा […]

सिडनी कसोटीला गालबोट; सिराजबद्दल घडलं असं काही
क्रीडा

सिडनी कसोटीला गालबोट; सिराजबद्दल घडलं असं काही

सिडनी : तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. सिडनीच्या मैदानावर मद्याच्या अमलाखाली असलेल्या काही समर्थकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी शेरेबाजी केली. त्यांची वक्तव्ये खूपच अपमानास्पद होती. जेव्हा सिराज सीमा रेषेवर फाइन लेगला क्षेत्ररक्षण करत होता. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे […]

तिसऱ्या दिवशी भारताला धक्के; सामन्यावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
क्रीडा

तिसऱ्या दिवशी भारताला धक्के; सामन्यावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

सिडनी : तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताला मोठे धक्के बसले त्यामुळे तिसऱ्या दिवशी सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारत वर्चस्व राखले आहे. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने २ बाद १०३ अशी मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण १९७ धावांची आघाडी आहे. आज भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताला अजिंक्य रहाणेकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, पण अजिंक्यला या अपेक्षा पूर्ण […]