मंत्रालयात दारूच्या बाटल्या; विरोधी पक्षनेत्यांची सरकारवर जोरदार टीका
राजकारण

मंत्रालयात दारूच्या बाटल्या; विरोधी पक्षनेत्यांची सरकारवर जोरदार टीका

मुंबई : मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. सर्वत्र याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर, हा प्रकार समोर आल्यानंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता महाविकासाआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी अशी घटना आज समोर आली आहे, असं म्हणत त्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची […]

मोठी बातमी ! १४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्य सरकारचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी ! १४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असताना दिसून येत आहे. नुकतीच राज्य सरकारने राज्यातल्या १४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये फेरबदल झाल्याचं दिसून येत आहे. राज्य सरकारने शुक्रवारी बदल्यांचे निर्णय जाहीर केले. या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या १. रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी, हिंगोली यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे […]

ब्रेकिंग! मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन; तपास सुरु
बातमी मुंबई

ब्रेकिंग! मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन; तपास सुरु

मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. मंत्रालयातील कंट्रोल रूमला बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. निनावी धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून कथित बॉम्बचा तपास सुरु आहे. साधारण एक तासाभरापूर्वी धमकीचा निनावी फोन मंत्रालयाला आला होता. […]

राज्यात बदल्यांचा धडाका सुरुच; आणखी ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
बातमी महाराष्ट्र

राज्यात बदल्यांचा धडाका सुरुच; आणखी ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

मुंबई : राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरुच असल्याचं दिसत आहे. काही दिवसापूर्वीच 4 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर, आता 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या करण्यात आलेले अधिकारी १) श्री. लोकेश चंद्र (IAS Lokesh Chand), आयएएस (१९९३) यांना प्रधान सचिव, सामान्य […]

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण विभागाचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण विभागाचा मोठा निर्णय

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील जलसंधारण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जलसंधारण विभागाने सकाळी आठ ते दुपारी चार आणि दुपारी बारा ते रात्री आठ अशी शिफ्ट मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विभागातील कर्मचाऱ्यांना वाटून शिफ्ट देण्यात आल्या आहेत. यामध्ये एका कर्मचाऱ्याला वर्क फ्रॉम होम करण्याची देखील मुभा देण्यात आली आहे.  […]

धक्कादायक! मंत्रालयातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
बातमी मुंबई

धक्कादायक! मंत्रालयातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत आहे. मुंबईत काल 921 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 19 हजार 128 झाला आहे. सद्यस्थितीत मुंबईत एकूण 5859 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. राज्यसरकारने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना लागू केल्या असून पुढील आठ दिवसात परिस्थिती पाहुन लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. असे […]

९ डिसेंबर २०२० : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आजचे निर्णय
बातमी महाराष्ट्र

९ डिसेंबर २०२० : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आजचे निर्णय

मुंबई : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्याचबरोबर […]

दोन मंत्र्यांना मिळणार नाही मंत्रालयात जागा; हलवावे लागणार कार्यालय समोरच्या इमारतीत
बातमी मुंबई

दोन मंत्र्यांना मिळणार नाही मंत्रालयात जागा; हलवावे लागणार कार्यालय समोरच्या इमारतीत

मुंबई : मंत्रालयात जागा नसल्याने राज्य मंत्रिमंडळातील दोन राज्यमंत्र्यांना मंत्रालयात जागा मिळणार नाही. त्यामुळे त्यांना समोरच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे. आता कोणत्या दोन मंत्र्यांना आपले कार्यालय समोरील इमारतीत हलवावे लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मंत्रालयात आग लागल्यानंतर जीटी रुग्णालयाजवळच्या इमारतीत हलविण्यात आलेली वैद्यकीय शिक्षण, आरोग्य विभाग आणि पाणीपुरवठा यांची कार्यालयेही […]