‘केंद्र- राज्य सरकारच्या वादात मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ’
बातमी मराठवाडा

‘केंद्र- राज्य सरकारच्या वादात मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ’

औरंगाबादः दिल्लीत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका मांडत केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असून ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलं आहे. हिवाळी अधिवेशनात बोलताना जलील म्हणाले की, शेतकऱ्यांची आत्महत्या आमच्यासाठी आता फक्त एक आकडेवारी म्हणून राहिली असून हे […]

राज्यातील काही भागात यलो अलर्ट; ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता
बातमी महाराष्ट्र

राज्यातील काही भागात यलो अलर्ट; ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात थोड्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील विविध ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ३ दिवस महत्वाचे असून या भागांना मुसळधार […]

मराठवाडा हादरला ! अविवाहित प्रियकरांसोबत विवाहितेची झाडाला घेऊन आत्महत्या
बातमी मराठवाडा

मराठवाडा हादरला ! अविवाहित प्रियकरांसोबत विवाहितेची झाडाला घेऊन आत्महत्या

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथील प्रेमी युगलाने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (ता. २२) शनिवारी पहाटे घडली. हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथील अविवाहित दत्ता व विवाहिता शारदा यांच्यात प्रेम संबंध होते. विशेष म्हणजे नवर्‍याशी पटत नसल्याने विवाहिता चार वर्षांपासून मामाकडेच कामारवाडी येथे वास्तव्यास होती. दरम्यान, काही दिवसांपासून त्यांच्या […]

राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर शेतपिकांचे मोठे नुकसान
इतर

राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर शेतपिकांचे मोठे नुकसान

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा फैलावू लागला असतान दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागले आहे. मराठवाड्यासह आज राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर विदर्भ आणि राज्यातील अन्य भागातही 18 ते 21 मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत […]

फडणवीसांची पवारांवर टीका; दादांच्या पोटातले ओठावर आले…
राजकारण

फडणवीसांची पवारांवर टीका; दादांच्या पोटातले ओठावर आले…

मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्षातील नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. अधिवेशनाला सुरवात झाल्यानंतर राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच आपण वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. मात्र याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला. ”दादांच्या पोटातले ओठावर आले. हा […]

नांदेडमध्ये खलिस्तानी दहशतवाद्याला अटक
बातमी मराठवाडा

नांदेडमध्ये खलिस्तानी दहशतवाद्याला अटक

नांदेड : नांदेडमध्ये खलिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. सरबजीतसिंघ किरट असे त्याचे नाव असून तो खलिस्तान जिंदाबाद संघटनेचा सदस्य आहे. त्याला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पंजाबच्या सीआयडी पथकाने रविवारी उशिरा अटक केली. बेल्जियमशी संबंधित खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनेशी तो संपर्कात होता. बेल्जियममधून त्याला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले जात होते. खलिस्तानचा विरोध करणारे हिंदू […]

हिंगोलीत ६१ महिलांचा संसार सुखी; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार
बातमी मराठवाडा

हिंगोलीत ६१ महिलांचा संसार सुखी; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

हिंगोली : महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी केंद्र सरकारने हिंगोली येथे २०१९मध्ये सखी वन स्टॉप सेंटर सुरु केले. वर्षभरात या केंद्राने जिल्हा महिला बालविकास कार्यालयाच्या मदतीने ६१ प्रकरणांचा विचार करून पिडित महिलांना समुपदेशन करुन त्यांना न्याय मिळवून दिला. यामध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुढाकार घेत मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील कळमनुरी वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, हिंगोली या […]

औरंगाबादच्या नामांतरावर रामदास आठवलेंनी मांडली भूमिका
राजकारण

औरंगाबादच्या नामांतरावर रामदास आठवलेंनी मांडली भूमिका

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. शिवसेना, भाजप व मनसेसह काही पक्षांनी नामांतराला पाठिंबा दिला आहे. तर, काँग्रेसनं कडाडून विरोध दर्शवला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. ‘औरंगाबादचं नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील,’ असं आठवले यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं […]