आघाडी सरकारमध्ये एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहावं लागतं – अजित पवार
राजकारण

आघाडी सरकारमध्ये एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहावं लागतं – अजित पवार

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. आघाडी सरकार चालवत असताना निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वांनी भूमिका मांडायची असते, पण एकदा निर्णय झाला की सर्वांनी समाधानी राहायचं असतं, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. यातून त्यांनी प्रभाग रचनेवरुन नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना […]

मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारकडून राज्यपालांना निवदेन; पंतप्रधानांचीही घेणार भेट
राजकारण

मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारकडून राज्यपालांना निवदेन; पंतप्रधानांचीही घेणार भेट

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज (ता. ११) राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना निवदेन सादर केलं. हे आरक्षण राष्ट्रपतींच्या माध्यमातून दिलं जावं यासाठी हे निवदेन देण्यात आलं आहे. लवकरच यासाठी पंतप्रधान मोदींची देखील भेट घेतली जाणार आहे. राज्यपालांना निवेदन सादर केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री […]

आम्ही सामना वाचत नाही अन् संजय राऊतांकडे लक्षही देत नाही- नाना पटोले
राजकारण

आम्ही सामना वाचत नाही अन् संजय राऊतांकडे लक्षही देत नाही- नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकासआघाडीमध्ये सातत्याने कशावरून तरी वाद होताना दिसत आहेत. अशात आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची भक्कम अशी नवीन आघाडी निर्माण होण्याची गरज आहे. असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं. शिवाय, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला आलेल्या […]

बीडमध्ये महाविकासआघाडीत अंतर्गत कुरबुर; काँग्रेस-शिवसेना नेत्यांची उघड नाराजी
राजकारण

बीडमध्ये महाविकासआघाडीत अंतर्गत कुरबुर; काँग्रेस-शिवसेना नेत्यांची उघड नाराजी

बीड : बीडमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षात अंतर्गत कुरघोड्या चालू असल्याचे आता समोर आले असून काँग्रेस-शिवसेना नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखविली आहे. राज्यात महाविकासआघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवर तीनही पक्षांमधल्या कुरबुरी समोर येत आहेत. सत्तेच्या राजकारणात शिवसेना आणि काँग्रेसला योग्य स्थान मिळत नसल्याचा आरोप दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. यामुळे बीड […]

सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदाच सुरक्षा; सरकारच्या बैठकीत निर्णय
राजकारण

सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदाच सुरक्षा; सरकारच्या बैठकीत निर्णय

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदाच राज्य सरकारकडून सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विरोधी पक्षासह सरकारमधील काही मंत्र्यांची सुद्धा सुरक्षा कमी केली आहे. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत. या […]

महाविकास आघाडीत धूसफूस? कॉंग्रेस नेत्याचे सोनियांना पत्र
राजकारण

महाविकास आघाडीत धूसफूस? कॉंग्रेस नेत्याचे सोनियांना पत्र

मुंबई : महाविकास आघाडीत धूसफूस सुरु असल्याचे सातत्याने समोर येत असतानाच मुंबईतील कॉंग्रेस कमेटीचे महासचिव विश्वबंधु राय यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहून राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल तक्रार केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सारं काही अलबेल नसल्याची चर्चा आहे. आमचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस हा जाणिवपूर्वक, रणनिती बनवून कॉंग्रेसला नुकसान पोहोचवतोय. ते आपल्या पक्षाला पुढे नेण्याच्या […]

आठवले म्हणतात, ‘तर मी मंत्रालयात कसा जाऊ’
राजकारण

आठवले म्हणतात, ‘तर मी मंत्रालयात कसा जाऊ’

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत. या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे सरकारला एक प्रश्न विचारला आहे. आठवले म्हणतात, राज्यसरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी […]

पुढील निवडणुका एकत्र की महाविकासआघाडीसोबत? शिवसेनेचा झाला निर्णय
राजकारण

पुढील निवडणुका एकत्र की महाविकासआघाडीसोबत? शिवसेनेचा झाला निर्णय

मुंबई : महाविकासआघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेने आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात येत्या काळात होणाऱ्या महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं घवघवीत यश […]

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी
राजकारण

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी

पुणे : ‘२१व्या शतकात देशाला जात-वर्णांवर आधारीत नव्हे तर विवेकानंदाना अपेक्षीत विश्वबंधूत्वाचे नाते जपणारे, विज्ञानधिष्ठीत, व्यापक व सर्वसमावेशक शैक्षणिक धोरण देण्यासाठी महाविकास आघाडीचेच ऊमेदवार निवडून द्यावेत असे आवाहन  पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक प्रचार सांगता प्रसंगी  काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले आहे. आज (ता. २९) रविवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी हे आवाहन केले. […]