जगातील सर्वात मोठे विमान मुंबईतील विमानतळावर उतरले; आकार पाहून प्रवासीही अवाक्
बातमी मुंबई

जगातील सर्वात मोठे विमान मुंबईतील विमानतळावर उतरले; आकार पाहून प्रवासीही अवाक्

मुंबई : नागरी उपयोगासाठीचे जगातील सर्वात मोठे विमान मंगळवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. ‘एअरबस बेलुगा’ असं नाव असलेल्या या विमानाला पाहून विमानतळावर उपस्थित प्रवासीही अवाक् झाले. एअरबस कंपनीचे ‘ए३००-६०० एसटी’ हे ‘बेलुगा’ नावे ओळखले जाणारे विमान ५१ टन मालवाहू क्षमतेसह जगातील सर्वात मोठे विमान आहे. वैमानिक खाली व विमानाचा मुख्य भाग त्याच्या […]

मोठी बातमी : मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती, ठाकरे सरकारचा निर्णय
बातमी मुंबई

मोठी बातमी : मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती, ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई : ठाकरे सरकारने (Thackeray Government) मोठा निर्णय घेतलाय. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (Mumbai Municipal Carporation) प्रशासकाची (Administrator) नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेची मुदत 7 […]

मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांची गळफास घेऊन आत्महत्या
बातमी मुंबई

मुंबईत प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांची गळफास घेऊन आत्महत्या

नवी मुंबई : नवी मुंबईत सानपाडा परिसरातील जॅक अँड जिल रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रेम पहूजा यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. घरातील गॅलरीच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. डॉक्टर प्रेम पहूजा यांची पत्नी कल्याण येथे राहात असल्याने डॉक्टर नवी मुंबईत एकटेच राहत होते. दुपारी साधारण १ वाजता रुग्ण आला असल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डॉक्टर प्रेम […]

मुंबईच्या भाजप कार्यालयात महिलेवर लैंगिक अत्याचार
बातमी मुंबई

मुंबईच्या भाजप कार्यालयात महिलेवर लैंगिक अत्याचार

मुंबई : मुंबईतील भाजपच्या कार्यालयात महिलेचा लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बोरिवलीत नगरसेविकेच्या कार्यालयातच ही घटना घडली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणावरुन काँग्रेस आणि शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचा आवाज दाबण्यासाठी भाजप नगरसेविकांनी मारहाण केली असा आरोप काँग्रेस प्रवक्ते […]

एटीएसची मोठी कारवाई, मुंबईतून संशयित दहशतवाद्याला अटक!
बातमी मुंबई

एटीएसची मोठी कारवाई, मुंबईतून संशयित दहशतवाद्याला अटक!

मुंबई : आज पहाटे महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच पथकासोबत केलेल्या या कारवाईत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात एटीएसला यश आलं आहे. या संशयित दहशतवाद्याचं नाव झाकिर असल्याचं सांगितलं जात आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत संशयित दहशतवादी […]

महाराष्ट्राला हादरवणारी घटना! बलात्कार करुन गुप्तांगात घुसवला रॉड
बातमी मुंबई

महाराष्ट्राला हादरवणारी घटना! बलात्कार करुन गुप्तांगात घुसवला रॉड

मुंबई : मुंबईत एक महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. महिलेवर बलात्कार करून आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला आहे. साकीनाका परिसरात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. मात्र यामध्ये अजून […]

शेअर बाजारात तेजी; रचला नवा विक्रम
बातमी मुंबई

शेअर बाजारात तेजी; रचला नवा विक्रम

मुंबई : भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवासांपासून तेजी पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटने पुन्हा एक इतिहास रचत ५८ हजारांचा पल्ला गाठला आहे. सेन्सेक्स पहिल्यांदाच ५८ हजारांच्या पार गेला आहे. आज (ता. ०३) सकाळच्या सत्रात मार्केट सुरु होताच २१७ अंकांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे सेन्सेक्स ५८,०६९ वर पोहोचला. त्याचबरोबर निफ्टीत ६६.२० अंकांची वाढ पाहायला […]

काही तासांत मुंबईसह कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता
बातमी मुंबई

काही तासांत मुंबईसह कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पावसाने मंगळवारी कोकण, मराठवाड्यासह नगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. मुंबई, कोकणासह मराठवाड्यात बुधवारी मुसळधारांचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील काही तासांमध्ये मुंबई, […]

नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल
बातमी मुंबई

नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुटीन चेकअपसाठी राणे रुग्णालयात गेल्याची माहिती देण्यात आली आहे. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यात वादळ उठलं होतं. याच दरम्यान राणे यांची जन आशीर्वाद यात्रा थांबली होती. ती लवकरच पुन्हा सुरु आहे. उद्या जन आशीर्वाद सिंधुदुर्गात असेल. […]

हा तर सिंहाचा अपमान; नारायण राणेंवरून विनायक राऊतांचा टोला
राजकारण

हा तर सिंहाचा अपमान; नारायण राणेंवरून विनायक राऊतांचा टोला

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाडमध्ये जन आशिर्वाद यात्रेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना राणेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. दरम्यान राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी शिवसेनेनं युवासेनेच्या कार्यकर्त्यांना राणेंच्या जुहूच्या घराबाहेर जमण्यास सांगितल्याचं ट्विट करत सिंहाच्या […]