परप्रांतीय मजुरांना ऊपासमारीने मरू द्यायचे होते का? – तिवारी
राजकारण

परप्रांतीय मजुरांना ऊपासमारीने मरू द्यायचे होते का? – तिवारी

पुणे : देशातील सुखसुविधा संपत्ती व ईन्फ्रास्ट्क्चर ऊभारणाऱ्या हातांना, विविध प्रांतीय मजुरांना ‘कोरोना काळातील लॅाकडाऊन’मध्ये त्यांचे कुटुंबियांपासून वंचित ठेवून, त्यांची उपासमार करीत त्यांना मरू द्यायचे होते काय? असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदींनी संसदेत केलेल्या भाषणावरील प्रतिक्रियापर निवेदनात केला आहे. स्व-कर्तुत्वाने देशाचा विकास दर व दरडोई ऊत्पन्न वाढवू न शकणारे […]

पक्षप्रवेशाआधीच शिवसेनेच्या माजी आमदाराला भाजपकडून उमेदवारी जाहीर
राजकारण

पक्षप्रवेशाआधीच शिवसेनेच्या माजी आमदाराला भाजपकडून उमेदवारी जाहीर

नांदेड : भाजपने शिवसेनेला जोरदार झटका दिला आहे. भाजपने देगलूरमध्ये शिवसेनेच्या माजी आमदाराला गळ लावला आहे आणि उमेदवारीही जाहीर केली आहे. नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा कोविडनंतर १० एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा पक्षप्रवेश होण्याआधीच […]

अखेर मनसेच्या इंजिनाला जोडला भाजपचा डबा; युतीची घोषणा
राजकारण

अखेर मनसेच्या इंजिनाला जोडला भाजपचा डबा; युतीची घोषणा

पालघर : भाजप आणि मनसेची युती होणार का? अशी चर्चांना वेग आलेला असतानाच अखेर मनसेचं इंजिन भाजपच्या डब्याला जोडलं गेलं आहे. पालघरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची पोटनिवडणूक होत आहे, या निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे लांबलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा कार्यक्रम ठरला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी […]

प्रचारादरम्यान भाजप खासदारावर हल्ला; सुरक्षा रक्षकाने काढली बंदूक
राजकारण

प्रचारादरम्यान भाजप खासदारावर हल्ला; सुरक्षा रक्षकाने काढली बंदूक

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तृणमूल आणि भाजपने ही जागा जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येथून निवडणूक लढवत आहेत. भाजपने प्रियांका तिब्रेवाल यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, प्रचारादरम्यान तृणमूल समर्थकांनी दिलीप घोष यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दिलीप घोष यांची भवानीपूरमध्ये पदयात्रा सुरू होती […]

भाजपनेते माजी केंद्रिय मंत्र्यांचा तृणमूलमध्ये प्रवेश
राजकारण

भाजपनेते माजी केंद्रिय मंत्र्यांचा तृणमूलमध्ये प्रवेश

कोलकाता : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी खासदार बाबुल सुप्रियो यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर सुप्रियो यांनी अलीकडेच भाजप सोडल्याचे जाहीर केले होते. त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणाही केली होती. त्यानंतर आता तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूलचे सदस्यत्व दिले आहे. यावेळी खासदार […]

ईडी, सीबीआयनंतर अनिल देशमुखांच्या घरी आयकर विभागाचे छापे!
राजकारण

ईडी, सीबीआयनंतर अनिल देशमुखांच्या घरी आयकर विभागाचे छापे!

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या काटोल येथील घरासोबतच जिल्ह्यातल्या त्यांच्याशी संबंधित ६ ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकले आहेत. त्यामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांनंतर अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आता ईडी आणि सीबीआयनंतर आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येनं आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काटोलमधील […]

गुजरातमध्ये २२ मंत्र्यांना एकसोबत डच्चू; २४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी
राजकारण

गुजरातमध्ये २२ मंत्र्यांना एकसोबत डच्चू; २४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी

अहमदाबाद : गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना गेल्या काही दिवसात वेग आला असून विद्यमान २२ मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज २४ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलेलं नाही. भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळात एकूण २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात १० जणांना कॅबिनेट मंत्रिपद, […]

भाजपने सहा महिन्यांत बदलले पाच मुख्यमंत्री
राजकारण

भाजपने सहा महिन्यांत बदलले पाच मुख्यमंत्री

अहमदाबाद : पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभा निवडणुकांना जवळपास एक वर्ष बाकी असताना विजय रुपाणी यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक पदाचा राजीनामा दिला होता. गुजरातमधील याच नेतृत्वबदलानंतर आता पुन्हा भाजपाशासित राज्यामध्ये नेतृत्व बदल होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपने सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलल्याच्या चर्चांणा वेग आला आहे. […]

भाजपचे उद्या सरकारविरोधात राज्यभर आंदोलन
राजकारण

भाजपचे उद्या सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाजपकडून उद्या (ता. १५) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी मंगळवारी केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे […]

राजू शेट्टींची आमदारांच्या यादीतून नाव गायब? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
राजकारण

राजू शेट्टींची आमदारांच्या यादीतून नाव गायब? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

पुणे : माजी खासदार राजू शेट्टी यांचे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून नाव मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, ही चर्चा सुरू झाल्यापासून राजू शेट्टींनी देखील उघडपणे नाराजी व्यक्त करत, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्य सरकारवर निशाणा साधला. विशेष, म्हणजे राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त करत, आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या अगोदर विधान परिषदेसाठी […]