देशातील २४ विद्यापीठं बोगस, हे राज्य पहिल्या क्रमांकावर; महाराष्ट्रातील या विद्यापीठाचा समावेश
देश बातमी

देशातील २४ विद्यापीठं बोगस, हे राज्य पहिल्या क्रमांकावर; महाराष्ट्रातील या विद्यापीठाचा समावेश

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील २४ स्वयंघोषित विद्यापीठं बनावट असल्याचं जाहीर केलं आहे. दोन विद्यापीठांकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याची माहिती लोकसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नावर उत्तर देताना केंद्रिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. विद्यार्थी, पालक, नागरिक तसंच प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे युजीसीने २४ विद्यापीठांना बोगस घोषित केलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय […]

प्रतिक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर
बातमी महाराष्ट्र

प्रतिक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी ०३ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर होणार आहे. सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा निकाल बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तसेच दहावी आणि […]

आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावीचा लागला निकाल; असा पाहा निकाल
बातमी महाराष्ट्र

आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावीचा लागला निकाल; असा पाहा निकाल

नवी दिल्ली : आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल ९९.९८ टक्के, तर बारावीचा निकाल ९९.७६ टक्के इतका लागला आहे. यंदा कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावीचा निकाल नववीचे गुण आणि दहावीच्या अंतर्गत गुणांच्या मुल्यांकनावर लावण्यात आला आहे. तर बारावीचा निकाल ११ वी आणि १२ वीच्या अंतर्गत परीक्षेतील गुणांवर […]

उद्या दुपारी १ वाजता लागणार दहावीचा निकाल
बातमी महाराष्ट्र

उद्या दुपारी १ वाजता लागणार दहावीचा निकाल

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी असून त्यांचा उद्या (ता. १५) दुपारी निकाल लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल ऑनलाईन जाहीर होईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. या वर्षीची दहावीची परीक्षा कोरोना प्रादुर्भावाचा विचार करुन रद्द करण्यात आली […]

राज्य सरकारचा मोठा निर्णय! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून याचा ४५ हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. कोरोनाकाळात इतर क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला आहे. या निर्णयामुळे या […]

मोठी बातमी! टीसी नसला तरी मिळणार दुसऱ्या शाळेत प्रवेश
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी! टीसी नसला तरी मिळणार दुसऱ्या शाळेत प्रवेश

मुंबई : कोरोना महामारीमुळे सर्वांनाच मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या शिक्षण विभागाने पालकवर्गास दिलासा देणारा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. या निर्णयानुसार आता, आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला नसला तरी अन्य शाळेत प्रवेश […]

डिसले गुरुजींनी पुन्हा उंचावली देशाची मान; मिळाले जागतिक स्तरावरील सन्मानाचे पद
देश बातमी

डिसले गुरुजींनी पुन्हा उंचावली देशाची मान; मिळाले जागतिक स्तरावरील सन्मानाचे पद

सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे रणजितसिंह डिसले यांनी देशाची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. त्यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जागतिक बँकेने त्यांची शिक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. डिसले गुरुजींची जून 2021 ते जून 2024 अशा तीन वर्षांच्या कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा […]

राज्य सरकारचा मोठा निर्णय; दहावीच्या परीक्षा रद्द!
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय; दहावीच्या परीक्षा रद्द!

मुंबई : सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आज (ता. २०) दहावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनाची गंभीर होत चाललेली परिस्थिती पाहाता आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे. मात्र, बारावीच्या परीक्षा होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट […]

केंद्राच्या निर्णयानंतर दहावीच्या परिक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

केंद्राच्या निर्णयानंतर दहावीच्या परिक्षाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचंही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार असून त्या रद्द होणार नसल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. केंद्रीय शिक्षण विभागाकडून […]

नववी आणि अकरावीचे विद्यार्थीही होणार सरसकट उत्तीर्ण
बातमी महाराष्ट्र

नववी आणि अकरावीचे विद्यार्थीही होणार सरसकट उत्तीर्ण

मुंबई : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील. या शैक्षणिक वर्षाच्या काळात राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच होणार आहेत. या परीक्षांच्या […]