शेतकरी आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू
देश बातमी

शेतकरी आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू

नवी दिल्ली : हरियाणातील सिंघू सीमेवर आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शवविच्छेदनानंतर अधिक तपशील शेअर केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. केंद्राच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांचा निषेध करण्यासाठी सोमवारी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवली आहे. सिंघू सीमेवरील शेतकऱ्यांनी दिल्ली-हरियाणा मार्गावरील १४ प्रवेश […]

संतप्त शेतकऱ्यांची भाजप आमदाराला मारहाण
देश बातमी

संतप्त शेतकऱ्यांची भाजप आमदाराला मारहाण

चंदीगडः पंजाबमध्ये मुक्तसर जिल्ह्यातील मलोटमध्ये शेतकऱ्यांचा संतप्त गटाने भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला मारहाण केली. एवढचं नव्हे तर आमदाराचे कपडेही फाडले. अबोहरमधील आमदार अरुण नारंग हे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी मलोट येथे गेले होते. शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भाजप आमदाराला झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा […]

आता हटणार नाही; शेतकऱ्यांची सीमारेषेवर घरे बांधण्यास सुरवात
देश बातमी

आता हटणार नाही; शेतकऱ्यांची सीमारेषेवर घरे बांधण्यास सुरवात

मुंबई : दिल्लीच्या सीमारेषांवर शेतकऱ्यांनी चालवलेलं आंदोलन अद्याप संपायचं नाव घेत नाहीये. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमारेषेवरच विटांचं कच्चं बांधकाम करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्या भूमिकेवर ठाम राहून दीर्घकालीन संघर्षासाठी शेतकऱ्यांनी तयारी केल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या ३ महिन्यांहून जास्त काळापासून आंदोलक शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन शेतकरी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी ठिय्या […]

भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका
राजकारण

भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

रांची : ”बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे, परंतु भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे. गेल्या १०० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. पंतप्रधानांना कोलकाता येथे जाण्यास, पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास वेळ आहे. परंतु, दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर […]

आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलाच करणार शेतकरी आंदोलनाचे नेतृत्त्व; हातावर काढणार इनक्लाबी मेहंदी
महिला विशेष

आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलाच करणार शेतकरी आंदोलनाचे नेतृत्त्व; हातावर काढणार इनक्लाबी मेहंदी

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्रसरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत या मागण्यांसाठी हे आंदोलन तीन महिन्यांपासून सुरु आहे. शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत तर केंद्र सरकारही आपल्या निर्णयावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्त्व महिला […]

शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण; राहुल गांधीचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल
राजकारण

शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण; राहुल गांधीचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल

नवी दिल्ली : “देशाच्या सीमेवर ज्यांची मुलं आपला जीव अर्पण करतात, त्यांच्यासाठी दिल्लीच्या सीमेवर खिळे अंथरले आहेत. अन्नदाता अधिकार मागत आहे, सरकार अत्याचार करत आहे!” अशा शब्दात कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या […]

अजय देवगणच्या गाडीची अडवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक
मनोरंजन

अजय देवगणच्या गाडीची अडवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक

मुंबई : अभिनेता अजय देवगण यांचे वाहन अडविल्याप्रकरणी राजदीप सिंग (वय २८) विरोधात गुन्हा दाखल करून दिंडोशी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन का देत नाही, असा जाब विचारत सिंगने अजय देवगणची गाडी अडवली होती. अजय देवगण सकाळ-सकाळी फिल्म सिटी येथे निघाले होते. मालाड पूर्वेला संतोषनगर परिसरात वाहतूक कोंडी असल्याने त्यांच्या वाहनाचा वेग […]

दिशा रवीच्या अटकेवर ग्रेटा थनबर्गची पहिली प्रतिक्रिया; अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि…
बातमी विदेश

दिशा रवीच्या अटकेवर ग्रेटा थनबर्गची पहिली प्रतिक्रिया; अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि…

नवी दिल्ली : टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिशा रवीच्या अटकेवर पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने प्रथमच भाष्य केलं आहे. टूलकिटमध्ये बदल करून ती पुढे पाठवल्याचा आरोप दिशावर असून, सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. दिशाच्या अटकेवरून ग्रेटानं लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करत टीका केली. दिशाच्या अटकेवर ग्रेटा थनबर्गने पहिल्यांदाच ट्विट केलं आहे. “अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि एकत्र […]

टूलकिट प्रकरणात दिशा रवीची ३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी
देश बातमी

टूलकिट प्रकरणात दिशा रवीची ३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

पटियाला : शेतकरी आंदोलनासंबधी टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दिशा रवीची पटियाला न्यायालयाने आज ३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. न्यायालयासमोर दिशाची पोलीस कोठडी वाढवून मागताना दिल्ली पोलिसांनी ‘दिशा चौकशी दरम्यान इतर आरोपींना दोष देत होती. त्यामुळे तिची शंतनु मुळूकसोबत समोरासमोर चौकशी करण्याची गरज आहे. २२ फेब्रुवारी रोजी त्याची चौकशी होणार असून तोपर्यंत […]

शेतकरी आंदोलनाचा जिओला मोठा झटका; ग्राहकांच्या संख्येत घट
देश बातमी

शेतकरी आंदोलनाचा जिओला मोठा झटका; ग्राहकांच्या संख्येत घट

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाचा रिलायंस जिओला मोठा फटका बसला आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं दोन ते अडीच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. सरकार काही उद्योजकांसाठी हे कायदे करत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान केला होता. त्याचबरोबर रिलायन्सच्या वस्तू आणि सेवांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन शेतकऱ्यांनी केलं होतं. त्याचा परिणाम जिओवर झाल्याचं ट्रायच्या […]