अनिल देशमुखांना झटका; सचिन वाझे ‘ईडी’चा माफीचा साक्षीदार होणार
बातमी मुंबई

अनिल देशमुखांना झटका; सचिन वाझे ‘ईडी’चा माफीचा साक्षीदार होणार

मुंबई: १०० कोटी रुपयांच्या वसूली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशातच आता बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली आहे. सचिन वाझे (Sachin Waze) याने ईडीला यासंदर्भात पत्र पाठवले आहे. आता १४ फेब्रुवारीला ईडी या पत्रासंदर्भात न्यायालयात आपलं म्हणणं मांडणार आहे. […]

धक्कादायक! पवारांसाठी देशमुखांनी २ कोटी मागितल्याचा सचिन वाझेचा ईडीकडे खुलासा
राजकारण

धक्कादायक! पवारांसाठी देशमुखांनी २ कोटी मागितल्याचा सचिन वाझेचा ईडीकडे खुलासा

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे प्रमुख आणि खासदार शरद पवारांच्या मनधरणीसाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते, असा खुलासा सचिन वाझेने ईडीकडे केला आहे. शरद पवारांनी वाझेला मुंबई पोलीस दलात पुन्हा रुजू करवून घेण्यास विरोध केला होता. यावर अनिल देशमुखांनी पवारांना राजी करण्यासाठी पैसे मागितले. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला शरद पवारांना मनवण्यासाठी २ कोटी रुपये […]

सचिन वाझेचा ईडीच्या जबाबात मोठा खुलासा; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ?
राजकारण

सचिन वाझेचा ईडीच्या जबाबात मोठा खुलासा; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ?

मुंबई : सचिन वाझेने आपल्या जबाबात मोठा खुलासा केला असून त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सचिन वाझे याने कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेचं नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्या सुत्रांनी ही माहिती दिल्याचे वृत्त न्यूज १८लोकमतने दिले आहे. 4 कोटी 80 लाख रुपये बार मालकांनी सचिन वाझेला दिले. सचिन […]

सचिन वाझेबाबत मुंबई पोलीस दलाचा मोठा निर्णय
बातमी मुंबई

सचिन वाझेबाबत मुंबई पोलीस दलाचा मोठा निर्णय

मुंबई : सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझेबाबत मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस दलातून त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून हा तपास सुरु होता. २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पियो कार आढळून आली होती. तर या गाडीचे […]

सचिन वाझे प्रकरणात मोठा खुलासा; नागपूर कनेक्शन आले समोर
बातमी महाराष्ट्र

सचिन वाझे प्रकरणात मोठा खुलासा; नागपूर कनेक्शन आले समोर

मुंबई : सचिन वाझे प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं असून याचा संबंध आता राज्य सरकारच्या अखत्यारित सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाशी जोडण्यात आला आहे. न्यूज १८ लोकमतेने दिलेल्या वृत्तानुसार कार माइकल रोडवर स्कॉर्पिओ गाडीत ठेवण्यात आलेल्या 20 कांड्या त्याच जिलेटिनच्या कांड्या आहेत, ज्याचा वापर महामार्ग बनवण्याकरता केला जात आहे. या कांड्या नागपूरमधील एका कंपनीत बनवल्याचंही उघड […]

अंबानी धमकी प्रकरणात नवी माहिती; वाझेचा तो प्लॅन ऐनवेळी फसला
बातमी महाराष्ट्र

अंबानी धमकी प्रकरणात नवी माहिती; वाझेचा तो प्लॅन ऐनवेळी फसला

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात नवीन माहिती समोर आली असून एनआयएने अटकेत असलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या मोठ्या कटाचा उलगडा करण्यात आला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, सचिन वाझे अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या वाहन प्रकरणी दोघांची हत्या करुन त्यांना या प्रकरणात गोवण्याची शक्यता होती. सचिन वाझे यांच्या निवासस्थानी एक पासपोर्ट सापडला असून हा या […]

सचिन वाझेच्या आरोपानंतर शिवसेनेच्या मंत्र्याने पत्रकार परिषदेतच घेतली बाळासाहेबांची शपथ
बातमी मुंबई

सचिन वाझेच्या आरोपानंतर शिवसेनेच्या मंत्र्याने पत्रकार परिषदेतच घेतली बाळासाहेबांची शपथ

मुंबई : सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रामध्ये अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच अनिल परब यांच्यावर देखील खंडणी वसूल करण्याची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपाला आता खुद्द अनिल परब यांनीच पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे. जे बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत त्यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, की सचिन वाझेंनी केलेले […]

न्यायालयाकडून सचिन वाझेंच्या चौकशीसाठी सीबीआयला परवानगी
बातमी मुंबई

न्यायालयाकडून सचिन वाझेंच्या चौकशीसाठी सीबीआयला परवानगी

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं असताना एनआय कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यावेळी कोर्टाने सीबीआयला सचिन वाझे यांची चौकशी करण्यासाठी परवानगी दिली असून चौकशी करण्यासाठी वेळेचं नियोजन करा असं कोर्टाने सीबीआयला सांगितलं आहे. त्याचबरोबर, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक […]

पवारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी देशमुखांनी मागितली २कोटींची खंडणी; वाझेंचा गौप्यस्फोट
बातमी मुंबई

पवारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी देशमुखांनी मागितली २कोटींची खंडणी; वाझेंचा गौप्यस्फोट

मुंबई : निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी आता राज्याला हादरवून टाकणारा गंभीर गौप्यस्फोट केला आहे. आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात केला केला […]

वाझेंनी केली का मनसुख हिरेनची हत्या? एनआयएकडून स्पष्टीकरण
बातमी मुंबई

वाझेंनी केली का मनसुख हिरेनची हत्या? एनआयएकडून स्पष्टीकरण

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं आढळून आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. हा मुद्दा गाजत असतानाच मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. हिरेन यांची हत्या पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी का केली? याची माहिती एनआयएने दिली आहे. हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र, प्राथमिक दर्शनी असं दिसत की, हिरेन यांचा मृत्यू गळा […]