‘एका दिवसाचा विलंबही लोकशाहीसाठी घातक, निर्णय लवकर घ्यावा ; सिब्बल यांचा जोरदार युक्तीवाद
राजकारण

‘एका दिवसाचा विलंबही लोकशाहीसाठी घातक, निर्णय लवकर घ्यावा ; सिब्बल यांचा जोरदार युक्तीवाद

नवी दिल्ली:एकनाथ शिंदे गटाच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने लवकर निर्णय घ्यावा. या प्रकरणात एक-एक दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. निर्णय घेण्यासाठी एक दिवसही उशीर होणे, हे लोकशाहीच्यादृष्टीने अत्यंत घातक ठरेल, असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना (Shivsena) प्रकरणातील चार याचिकांवर सुनावणी […]

केरळला अकरावीच्या ऑफलाईन परीक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयानकडून परवानगी
देश बातमी

केरळला अकरावीच्या ऑफलाईन परीक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयानकडून परवानगी

नवी दिल्ली : केरळ सरकारला सर्वोच्च न्यायालयाने अकरावी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी परवानगी दिली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या केरळ सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकेवर सुनावणीदरम्यान राज्याकडून सर्वोच्च न्यायालयास सांगण्यात आले की, सर्व कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून परीक्षांचे आयोजन केले जाईल. यानंतर न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि सीटी […]

सरन्यायाधीशांनी पहिल्यांदाच एकाचवेळी नऊ न्यायाधीशांना दिली शपथ
देश बातमी

सरन्यायाधीशांनी पहिल्यांदाच एकाचवेळी नऊ न्यायाधीशांना दिली शपथ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी ऐतिहासिक नऊ न्यायाधीशांना एकाचवेळी शपथ दिली. या ९ न्यायाधीशांमध्ये तीन महिला न्यायाधीशांचा समावेश आहे. हा शपथ सोहळा न्यायालयाच्या अतिरिक्त भवन परिसरातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सरन्यायाधीश एनवी रमण यांनी नऊ न्यायाधीशांना शपथ दिली. सामान्यत: न्यायाधीशांना कोर्ट रुममध्ये शपथ दिली जाते. श्रीनिवास ओका, विक्रम नाथ, जितेंद्र कुमार माहेश्वरी, हिमा […]

अनिल देशमुखांना मोठा झटका; सर्वोच्च न्यायलायकडूनही मिळाला नाही दिलासा
राजकारण

अनिल देशमुखांना मोठा झटका; सर्वोच्च न्यायलायकडूनही मिळाला नाही दिलासा

नवी दिल्ली : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्यांना दिलासा मिळालेला नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयचा एफआयआर रद्द करण्यास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने अटकेची टांगती तलवार अनिल देशमुखांवर कायम आहे. अनिल […]

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिका
बातमी महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिका

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासाठी फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे की केंद्राला, या मुद्यावर केंद्र सरकारने फेरविचार याचिका सादर केली आहे. आरक्षण ५० टक्क्य़ांहून अधिक देता येणार नाही, अशी मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने इंद्रा साहनी प्रकरणी […]

सर्वोच्च न्यायालय म्हणतेय संपूर्ण देशात महाराष्ट्र मॉडेलचा वापर करण्याची गरज
देश बातमी

सर्वोच्च न्यायालय म्हणतेय संपूर्ण देशात महाराष्ट्र मॉडेलचा वापर करण्याची गरज

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून अशात सर्वोच्च न्यायालयाने ऑक्सिजनच्या नियोजनासंदर्भात मुंबई पालिकेचं कौतुक केलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असतानाही मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला नसल्याच्या मुंबई पालिकेच्या प्रयत्नांचे सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं आहे. पालिकेने व्यवस्थापन कसे केले, याचे पालिका अधिकाऱ्यांकडून धडे घेण्याची सर्वोच्च न्यायालयाने केंद्र तसंच दिल्ली सरकारला केली. […]

अनिल देशमुख आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका
राजकारण

अनिल देशमुख आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला असून सीबीआय चौकशीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. अनिल देशमुख आणि राज्य सरकार यांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्याने सीबीआय चौकशी सुरु राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सुप्रीम कोर्टाने यावेळी महाराष्ट्रातील […]

निवडणुका आहेत म्हणून न्यायालय सुनावणी स्थगित करू शकत नाही
बातमी महाराष्ट्र

निवडणुका आहेत म्हणून न्यायालय सुनावणी स्थगित करू शकत नाही

नवी दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी सुरु आहे. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण असू शकतं का? यावर न्यायालयाने सर्व राज्यांना कोर्टाने नोटिसा दिल्या होत्या. मात्र आज काही राज्यांनी वेळ वाढवून मागितला होता. यावर न्यायालयाने सुनावणी स्थगित न करता एक आठवड्याचा वेळ वाढवला आहे. 102 व्या घटना दुरुस्ती नंतर म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या […]

मराठा आरक्षण; चार राज्यांनी उत्तरासाठी मागितला चार आठवड्यांचा वेळ
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षण; चार राज्यांनी उत्तरासाठी मागितला चार आठवड्यांचा वेळ

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावर उद्या (ता.१५) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण असू शकतं का? यावर न्यायालयाने राज्यांच्या प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टानं मागवल्यात. मात्र उद्याच्या सुनावणी आधी चार राज्यांनी उत्तरासाठी अधिकचा वेळ मागितला आहे. पंजाब, हरियाणा, तमिळनाडू, छत्तीसगड या चार राज्यांनी उत्तरासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे. उद्या सकाळी साडेदहा वाजता पाच […]

महिलांना NDA मध्ये प्रवेश का नाही?: सर्वोच्च न्यायालायची केंद्राला नोटीस
देश बातमी

महिलांना NDA मध्ये प्रवेश का नाही?: सर्वोच्च न्यायालायची केंद्राला नोटीस

नवी दिल्ली : नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा, यासंदर्भात सर्वोच्च नायायालयात अ‌ॅड. कुश कार्ला जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान, न्यायालयाने नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यासंदर्भातील याचिकेवर बाजू मांडण्यासाठी संरक्षण मंत्रालय, नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन डिफेन्स […]