चीनला मोठा दणका! अॅपल कंपनीने घेतला मोठा निर्णय
टेक इट EASY

चीनला मोठा दणका! अॅपल कंपनीने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : चीनला आता आणखी एक मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेची तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी अॅपल कंपनी आता आयफोन, आयपॅड, मॅक आणि इतर वस्तूंचं चीनमधील उत्पादन केंद्र इतरत्र हालवणार आहे. अॅपल कंपनी आता लवकरच आपल्या पहिल्या 5G स्मार्टफोन आणि आयफोन 12 सीरीजच्या उत्पादनाला भारतात सुरू करणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अॅपल कंपनीच्या आयपॅडचं उत्पादन व्हिएतनाममध्ये होणार आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत हे उत्पादन सुरू होणार आहे. अॅपल कंपनी पहिल्यांदाच चीनबाहेर एवढ्या मोठ्या संख्येनं उत्पादन तयार करणार आहे. अॅपल कंपनी भारतातही आयफोनचं उत्पादन वाढवण्याच्या तयारीत आहे. आयफोन-12च्या सीरीजचं उत्पादन याच तिमाहीत सुरू केलं जाणार आहे. अॅपल कंपनीचे फोन तयार करण्याचं सर्वात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं उत्पादन केंद्र भारत आहे.

आग्नेय आशियामध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी अॅपल कंपनी बर्‍याच भागात आपली उत्पादन केंद्रे निर्माण करण्याच्या विचारात आहे. अॅपल कंपनीचे स्मार्ट स्पीकर्स, इयरफोन आणि संगणक या वस्तूंच उत्पादन वाढवण्यावरही कंपनी भर देत आहे. अॅपल कंपनीच्या उत्पादन केंद्रात फेरबदल करणं हा कंपनीच्या रणनीतीचा हा एक भाग आहे. 2021 मध्ये या क्षेत्रात तेजी येईल, हे यामागचं गणित आहे.