टेक इट EASY

WhatsApp युजर्ससाठी खुशखबर! आता येतयं नवं फिचर…

नवी दिल्ली : सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या युगात फेसबुक, WhatsApp, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यानुसार कंपनीकडून आपल्या युजर्ससाठी नवंनवे फिचर्स देण्याचा विचार असतोच. त्यानंतर आता WhatsApp आपल्या युजर्ससाठी एक नवं फिचर आणण्याच्या तयारीत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

WhatsApp मधील नव्या फिचरच्या माध्यमातून तुम्हाला अनेक चॅटसाठी वेगवेगळे बॅकग्राऊंड ठेवता येणार आहे. सध्या या नव्या फिचरचे टेस्टिंग सुरू आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना ऍन्ड्रॉईड बिटा व्हर्जन वापरण्याची परवानगी आहे, पण त्यांना हे नवं फिचर वापरता येणार नाही. तसेच जेव्हा हे फिचर पूर्णपणे तयार होईल तेव्हा ऍन्ड्रॉईड बिटा व्हर्जन वापरणाऱ्या व्यक्तींसाठी हे फिचर उपलब्ध हेणार आहे. त्यानंतर जे WhatsApp युजर आहेत त्यांना हे फिचर वापरता येणार आहे. बिटा व्हर्जन v2.20.199.5 वर हे नवीन फिचर जोडण्यात येणार आहे.

WhatsApp होणार आणखी अपडेट

WhatsApp बिटा व्हर्जन अंतर्गत नव्या फिचरवर काम करत आहे. या फिचरमध्ये ग्रुप कॉलिंगसाठी रिंगटोन, कॉन्टॅक्ट शॉर्टकट, स्टिकर ऍनिमेशन यांसारख्या नव्या फिचरचा समावेश आहे. तसेच WhatsApp आणखी अपडेट होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत