टेक इट EASY

बापरे ! ऑनलाइन शॉपिंगमध्ये येतय नकली सामान; जाणून घ्या असं झाल्यास काय करायचं ?

कोरोना काळात माणसाला डिजिटल माध्यमांशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे, सर्वकाही डिजिटल होताना दिसत असून ऑनलाईन शॉपिंग साईटचीही क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच, नवरात्री उत्सवाच्या मुहूर्तावर फ्लिपकार्ट आणि अमेझॉनसारख्या शॉपिंग साईट्सने ऑनलाईन खरेदीवर मोठ्या ऑफर सुरू केल्या आहेत. मात्र ऑनलाईन शॉपिंगमध्ये नकली सामान येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधानता बाळगण्याची गरज आहे. तसेच अशी फसवणूक झाल्यास काय करायचे हे आम्ही सांगणार आहोत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऑथेंटिकेशन सॉल्यूशन प्रोव्हाईडर असोसिएशनचे अध्यक्ष नकुल पसरीचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑफर्सच्या जाळ्यात अडकू नका. वेबसाईट किती ऑथेंटिक आहे हे तपासा. अनेकदा ऑफर्सशी जोडलेल्या वेबसाईट्स खोट्या वेबसाईट प्लॅटफॉर्मवर पोहचवतात, त्यामुळे सतर्क राहा.

काय कराल

पार्सल घरी आल्यानंतर, पार्सल ओपन करताना मोबाईलमध्ये त्याचं रेकॉर्डिंग करा. रेकॉर्डिंगमुळे सामान नकली किंवा डिफेक्टिव्ह आल्यास रिटर्न करताना अडचण येत नाही.

क्यूआर कोड आणि होलोग्राम स्टीकरवरूनही वस्तू बनावट आहे की नाही हे तपासता येऊ शकतं. मिठाई, स्नॅक्स किंवा चॉकलेट हँपर ऑनलाईन खरेदी करताना, ज्या ब्रँडचं प्रोडक्ट आहे त्याचं स्पेलिंग आणि पॅकेजिंग योग्यरित्या तपासा.

एका अंदाजानुसार, 2018-19 मध्ये ऑनलाईन सामानाच्या नकली विक्रीच्या प्रकारात 24 टक्क्यांची वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स, ब्रॅन्डेड फुटवेयर किंवा खाण्या-पिण्याचं सामान खरेदी करताना, खरेदीदार म्हणून सतर्क राहण्याची गरज आहे. या कॅटेगरीमध्ये नकली सामान अतिशय हुशारीने विकलं जाऊ शकतं, असंही सांगण्यात आलं आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत