टेक इट EASY

तुम्हाला कोण कॉल करतंय याची माहिती देणार आता गुगल

संपूर्ण जगभराची माहिती देणारं गुगल आता तुम्हाला कोण कॉल करतंय याची देखील माहिती देणार आहे. तुम्ही म्हणाल ते कसं काय? गुगलने युजर्ससाठी एक खास फिचर आणले आहे. या नव्या फिचरचे नाव ‘Verified Calls’ आहे. हे फिचर कंपनीने 5 देशांमध्ये लॉंच केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या फीचरच्या मदतीने युजर्सना स्पॅम कॉलबाबत समजू शकेल. गुगलचे हे फीचर युजर्सना सांगेल की कोण कॉल करत आहे आणि कारण काय आहे, त्याचप्रमाणे कॉलरचा लोगो देखील दाखवण्यात येईल. फ्रॉड कॉलवर रोख आणणे हे या फीचरमागचे महत्त्वाचे कारण आहे.

सध्या अशाप्रकारचे फीचर TrueCaller या अ‍ॅपमध्ये मिळते आहे, जे युजर्सना अनोळखी कॉलबाबत माहिती देते. गुगल Verified Calls  आता TrueCallerचे काम करेल. हे फीचर युजर्सची अनेक कामे सुखकर करेल. युजर्सना या फीचरसाठी कोणतंही थर्ड पार्टी अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार नाही.

गुगलच्या पिक्सल सीरीज शिवाय खूप अँड्रॉईड फोन्समध्ये डिफॉल्ट Google Phone अ‍ॅप हेच डायलरचे काम करीत असतात. या सर्व फोन्समध्ये नवीन फीचर अपडेटसोबत मिळेल. जर फोनमध्ये Google Phone अ‍ॅप इन्स्टॉल नसेल तर गुगल प्ले स्टोरवरून ते इंस्टॉल करता येते. गुगलचे हे नवीन फीचर्स युजर्सना बिझनेस कॉल करण्यामागचं कारण सुद्धा सांगणार आहे. TrueCaller मध्ये हे फीचर अद्याप उपलब्ध नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत