आधार अपडेशनच्या कामासाठी पैसे मागितल्यास सावध; ‘या’ ठिकाणी करा तक्रार
टेक इट EASY

आधार अपडेशनच्या कामासाठी पैसे मागितल्यास सावध; ‘या’ ठिकाणी करा तक्रार

नवी दिल्ली- भारताच्या नागरिकांसाठी आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. अनेकदा आधारकार्ड तयार करताना काही चुका होतात. या चुका सुधारण्यासाठी धावपळ करावी लागते. तर कधी कधी पैसेही मोजावे लागते. यामधूनच आधार कार्ड अपडेट करण्याचे उद्योग सुरू झाले. मात्र हे उद्योग सुरू करून देण्याचा गोरखधंदा करण्यात येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आधारशी संबंधित सर्व्हिस देणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने नागरिकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. यूआयडीआयएने (UIDAI) एका ट्विटमध्ये सांगितलं की, आधार ऑपरेटर्सची नियुक्ती यूआयडीआयए नाही, तर ती रजिस्ट्रारकडून केली जाते. आधार सेंटर ऑपरेटर बनण्यासाठी त्या व्यक्तीला आपल्या क्षेत्रातील रजिस्ट्रारशी संपर्क करावा लागतो. त्यामुळे जर कोणी पैसे घेऊन आधार सेंटर ऑपरेटर बनवण्याचा दावा करत असल्यास सावध व्हा. अशाप्रकारे कोणी पैसे मागितल्यास, 1947 नंबरवर कॉल करून त्याची तक्रार दाखल करा.

आधारसंबंधी सर्व समस्या एका फोन कॉलवर दूर होऊ शकतात. आधार कार्डसंबंधी कोणतीही माहिती हवी असल्यास टोल फ्री हेल्पलाईन 1947 वर कॉल करू शकता. ही हेल्पलाईन हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, बंगाली, असामिया आणि उर्दू अशा 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. हा नंबर लक्षात ठेवणंही सोपं आहे, त्याचवर्षी देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं.