टेक इट EASY

‘या’ बाबतीत Jio ठरले तिसऱ्या वर्षीही अव्वल, सीमकार्ड घेताय ? तर मग ही बातमी तुमच्यासाठी

सध्या मोबाईल कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू आहे. मात्र ही स्पर्धा कॉलिंग व्यतिरिक्त इंटरनेट स्पीडवर ठरत आहे. तुम्ही जर नवीन सीम कार्ड घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दरवर्षी कोणत्या टेलिकॉम कंपनीचा इंटरनेट स्पीड अधिक आहे याचा सर्व्हे करण्यात येत असतो. यामध्ये Jio ने सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI)च्या आकड्यांनुसार जिओचा डाऊनलोड स्पीड 19.3MBPS आहे. तर दुसऱ्या स्थानावर वोडाफोन – आयडिया आहेत. TRAI ने 10 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, व्होडाफोनचा डाऊनलोड स्पीड 7.9MBPS आहे. तर एअरटेलचा स्पीड 7.5MBPS इतका आहे.

यापूर्वी ओपन सिग्नल या कंपनीने सप्टेंबरमध्ये 49 शहरांचा सर्व्हे केला होता. त्यामध्ये एअरटेलचा स्पीड सर्वात जास्त होता. ट्रायच्या आकडेवारीनुसार सर्वच टेलिकॉम कंपन्यांचा डाऊनलोडिंग स्पीड सप्टेंबरमध्ये वाढला आहे. रिलायन्स जिओ नेटवर्कचा डाऊनलोडिंग स्पीड सप्टेंबरमध्ये 21 टक्क्यांनी वाढला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत