नवीन किंमतीसह जिओचे प्लान्स आजपासून लागू, आता खर्च करावे लागतील ‘एवढे’ रुपये
टेक इट EASY

नवीन किंमतीसह जिओचे प्लान्स आजपासून लागू, आता खर्च करावे लागतील ‘एवढे’ रुपये

नवी दिल्ली :एअरटेल आणि वीआय पाठोपाठ रिलायन्स जिओने देखील प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. रिलायन्स जिओच्या प्लान्सचे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. ग्राहकांना प्लान्ससाठी आता जवळपास ४८० रुपयांपर्यंत अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान

जिओचा ७५ रुपयांचा प्लान आता ९१ रुपयांचा झाला आहे. यामध्ये दररोज १०० एमबी डेटा मिळतो. याची वैधता २८ दिवस आहे.

जिओचे २८ दिवस वैधतेसह येणारे प्लान्स

जिओच्या १२९ रुपयांच्या प्लानसाठी १५५ रुपये मोजावे लागतील. यात एकूण २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज ३०० मेसेजची सुविधा मिळते.

१९९ रुपयांचा प्लान आता २३९ रुपयांचा झाला आहे. यात दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मेसेजची सुविधा मिळते.

२४९ रुपयांच्या प्लानसाठी २९९ रुपये खर्च करावे लागतील. यात दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मेसेज मिळतात.

कंपनीचा ३९९ रुपयांचा प्लान आता ४७९ रुपयांचा झाला आहे. यात दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० मेसेजची सुविधा मिळते.

जिओच्या ४४४ रुपयांच्या प्लानसाठी ५३३ रुपये मोजावे लागतील. प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मेसेजची सुविधा मिळते.

जिओचे ८४ दिवसांचे प्लान

३२९ रुपयांचा प्लान आता ३९५ रुपयांचा झाला असून, यात दररोज ६ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १००० मेसेज मिळतात.

५५५ रुपयांचा प्लान आता ६६६ रुपयांचा झाला असून, यात ८४ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मेसेजची सुविधा मिळते.

जिओचा ५९९ रुपयांचा प्लान आता ७१९ रुपयांचा झाला आहे. यात दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मेसेजची सुविधा मिळते.

जिओचा ३६५ दिवस वैधतेसह येणारा प्लान

जिओचा २,३९९ रुपयांचा प्लान आता २,८७९ रुपयांचा झाला आहे. प्लानमध्ये दररोज दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात.