मोठी बातमी! आता घरबसल्या करा कोरोनाची तपासणी
टेक इट EASY

मोठी बातमी! आता घरबसल्या करा कोरोनाची तपासणी

नवी दिल्ली : इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने घरात कोरोना व्हायरस टेस्टिंग करण्यासाठी कोविसेल्फ किटला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता घरबसल्या अवघ्या 250 रुपयांत रॅपिड अँटिजन टेस्ट किट आणून कोविडची चाचणी करता येणार आहे. विशेष म्हणजे फक्त 15 मिनिटात कोरोना चाचणीचा अहवाल हाती येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना टेस्ट घरच्या घरी कशी करावी ? जाणून घ्या स्टेप्स
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने घरात कोरोना व्हायरस टेस्टिंग करण्यासाठी कोविसेल्फ किटला मंजुरी दिली आहे. या टेस्ट किटबद्दल सविस्तर जाणून घेऊयात!

१) ‘मायलॅब कोविसेल्फ अ‍ॅप डाऊनलोड करा
२) सर्वप्रथम किट सोबत मिळालेले माहितीपुस्तिका व्यवस्थित वाचून घ्या.
३) यानंतर ‘मायलॅब कोविसेल्फ अ‍ॅप’ प्ले स्टोअरहुन डाऊनलोड करावे
४) किट सोबत आलेला क्यूआर QR कोड स्कॅन करून आपली माहिती द्या.

अशी करा घरी कोरोना टेस्ट
१) कोरोना तपासणीसाठी सर्वप्रथम ‘कोविसेल्फ’ किट घेऊन या.
२) किटमधील नेझल स्वॅब दोन्ही नाकपुड्यांमध्ये 2 से 4 सेमी आतपर्यंत टाका.
३) नेझल स्वॅब दोन्ही नाकपुड्यांत पाच वेळा फिरवावे.
४) स्वॅब आधीपासून भरलेल्या ट्यूबमध्ये टाकावा आणि उरलेला स्वॅब तोडून टाकावा
५) ट्यूबचे झाकण बंद करावे. टेस्ट कार्डवर ट्यूब दाबून एकामागून एक दोन थेंब टाकावेत
६) चाचणी अहवालासाठी 15 मिनिटं वाट पाहावी. 20 मिनिटांनंतर येणारा निकाल अवैध मानला जाईल

पॉझिटिव्हि की निगेटिव्ह ?
१) टेस्ट कार्डवर दोन सेक्शन असतील. एक कंट्रोल, तर दुसरा सेक्शन.
२) जर बार केवळ कंट्रोल सेक्शन Cवर असेल, तर कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे.
३) जर बार कंट्रोल सेक्शन C आणि सेक्शन T या दोन्हीवर असेल, तर अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आहे.