OnePlus
टेक इट EASY

12 GB RAM सह OnePlus 8T लाँच; फक्त 39 मिनिटांत होतोय Fully Charged

नवी दिल्ली :  प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus ने आपला नवा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. OnePlus ने आता OnePlus 8T स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. OnePlus चा हा नवीन फोन 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 65 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टचा आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

OnePlus 8T: Everything you need to know before buying | Android Central

OnePlus 8T या स्मार्टफोनमध्ये 12 GB RAM+256 GB इंटरनल स्टोरेजच्या मॉडेलची किंमत 45,999 रुपये असणार आहे. तर 8 GB RAM+128 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 42,999 रुपये आहे. त्याचबरोबर 8GB RAM मॉडेल एक्वामारिन ग्रीन आणि लूनर सिल्व्हर कलरमध्ये उपलब्ध आहे. तर 12 GB RAM मॉडेल केवळ एक्वा मरीन कलरमध्ये उपलब्ध आहे.

OnePlus 8T या स्मार्टफोनची विक्री आजपासून सुरु झाली आहे. Amazon, वनप्लस इंडिया वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअरमधून हा फोन खरेदी करता येईल. Amazon प्राईम आणि वनप्लस रेड केबल क्लबच्या मेंबर्सला 16 ऑक्टोबरपासून हा फोन खरेदीस सुरुवात झाली आहे.

असे आहेत फिचर्स…

अँड्रॉइड 11 बेस्ड ऑक्सीजनओएस 11 वर काम करतो.

– 120 एचझेड रिफ्रेश रेटसह 6.55 इंचाचा फुल एचडी+फ्युलेड एमोलेड डिस्प्ले

– फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आणि 12 जीबी रॅम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत