पॅनकार्ड-आधार लिंक करण्याबाबत मोठी बातमी; मुदतीत वाढ
टेक इट EASY

पॅनकार्ड-आधार लिंक करण्याबाबत मोठी बातमी; मुदतीत वाढ

मुंबई : पॅनकार्ड-आधार लिंक करण्याबाबत केंद्र सरकारने मुदतीत वाढ करण्यात आली असून आयकर विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवरून ही माहिती देण्यात आलीय. आता, पॅन क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोविड १९ संक्रमणादरम्यान नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी मुदत वाढविली जात असल्याचं म्हटलं आहे. ३१ मार्च २०२१ ऐवजी आता ३० जून २०२१ पर्यंत नागरिकांना कोणत्याही शुल्काशिवाय किंवा दंडाशिवाय आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडता येणार आहे.

कोणत्याही दंडाशिवाय आधार आणि पॅन क्रमांक एकमेकांना लिंक करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं नागरिकांची सरकारी अधिकृत वेबसाईटवर एकच झुंबड उडाली होती. नागरिकांनी आज शेवटच्या दिवशी सायबर कॅफे, महा ई-सेवा केंद्र आणि इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी पॅनकार्ड आधार जोडणीसाठी गर्दी केलेली दिसली. एकाच वेळी अनेक युझर्सनं लॉग इन केल्यानं आयकर विभागाचा सर्व्हर डाऊन झाला होता. त्यामुळे वेबसाईटवर आलेल्या नागरिकांच्या पदरी निराशाच पडली. परंतु, उद्या याच कामासाठी १००० रुपयांचा भुर्दंड भरावा लागणार असं वाटत असताना आयकर विभागाकडून पुन्हा एकदा नागरिकांना दिलासा मिळाला आहे.