भारतात प्रथमच ! एक्झिकेटिव्ह नव्हे तर रोबो देतोय चारचाकी वाहनाची डिलिव्हरी
टेक इट EASY

भारतात प्रथमच ! एक्झिकेटिव्ह नव्हे तर रोबो देतोय चारचाकी वाहनाची डिलिव्हरी

कोची- तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. मोबाईलच्या मदतीने अनेक कामे आता होत आहे. मोबाईलच्या तुलनेत रोबोच्या संशोधनात म्हणावी तशी प्रगती झाली नाही. मात्र आता अत्याधुनिक रोबो तयार करण्यासाठी तज्ज्ञ प्रयत्नशील आहे. नुकतीच एका रोबोने चारचाकी वाहनाची डिलिव्हरी ग्राहकाला दिल्याचे समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केरळमध्ये अशाच पद्धतीने शोरूममध्ये रोबोच्या मदतीने किया सोनेट या गाडीची डिलिव्हरी केली जात आहे. ह्युमन रोबोच्या मदतीने याआधी कुठेही अशा पद्धतीने डिलिव्हरी झालेली नाही. सयाबोट नावाच्या या ह्युमन रोबोच्या माध्यमातून ग्राहकांना गाडीची डिलिव्हरी देण्यात येत आहे. कोची येथील असीमोव रोबोटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयकृष्णन उपस्थित असल्याने ही विशेष डिलिव्हरी करणं शक्य झालं.

ग्राहकाला रोबोद्वारे चावी आणि कागदपत्रे देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअऱ करण्यात आला आहे. यामध्ये हा रोबो गाडीविषयी माहिती देतानाही दिसत आहे. याचबरोबर शोरूमच्या अधिकाऱ्यांनी त्याला सेवेबद्दल विचारलं असता त्याने याचे उत्तर देखील दिलं. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी रोबोच्या हातात चावी दिल्यानंतर त्याने ती ग्राहकाच्या हातात देऊन डिलिव्हरी पूर्ण केली.