टेक इट EASY

SBI एटीएम कार्डचे हे नवं सेफ्टी फिचर; फसवणूकीला बसणार आळा

एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाण हल्ली मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या पैशांच्या सुरक्षेसाठी नवीन सुरक्षित एटीएम सेवा सुरु केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काय आहे एसबीआयची सुरक्षित एटीएम सेवा-

जेव्हा तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल किंवा मिनी स्टेटमेंट चेक करत असाल तर अशी मागणी तुमच्या बॅंकेकडे होईल तेव्हा बॅंक तुम्हाला  एसएमएसच्या माध्यमातून त्वरीत अलर्ट करेल. त्यामुळे संबधित ग्राहकाद्वारेच व्यवहार होत आहेत की नाही याची खात्री पटवता येईल. तसेच जर इतर कोणी तुमच्या एटीएमचा वापर करत असेल तर ग्राहकालाही मेसेज गेल्यामुळे समजेल की आपल्या एटीएमचा गैरवापर होत आहे. त्यामुळे ग्राहकाला त्वरीत आपले एटीएम कार्ड ब्लॉक करता येऊ शकते. असे बॅंकेने म्हटले आहे. त्यामुळे फसवणूकीचे प्रमाण कमी होऊन ग्राहकांना सुरक्षित व्यवहार करता येईल.

या नवीन सेवेमुळे ग्राहकांना सुरक्षित व्यवहार करता येईल आणि एटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकींच्या घटनांना देखील आळा बसेल. ज्या ग्राहकाला आपले एटीएम कार्ड ब्लॉक करायचे असल्यास त्यांनी एसबीआयच्या कस्टमर केअरला कॉल करुन किंवा नेट बॅंकिंग अथवा एसबीआयच्या ॲप द्वारे त्यांना ब्लॉक करता येणार आहे.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत