Free मिळणार ५०० Mbps इंटरनेट स्पीड, ‘असा’ घ्या स्किमचा लाभ, पाहा डिटेल्स
टेक इट EASY

Free मिळणार ५०० Mbps इंटरनेट स्पीड, ‘असा’ घ्या स्किमचा लाभ, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेत ब्रॉडबँड बाजारात असे अनेक प्लान्स आहेत जे युजर्सना खूप फायदे देतात. BSNl असो किंवा Jio, प्रत्येक कंपनी युजर्सना जबरदस्त फायदे उपलब्ध करुन देतात. त्याचप्रमाणे, आणखी एक कंपनी आहे जी काही भन्नाट ऑफर्स युजर्सना देत आहे. ACT किंवा Atria Convergence Technology Fibernet त्यांच्या ग्राहकांना नोव्हेंबरसाठी अतिरिक्त गती लाभ देत असून यासाठी स्पीड अपग्रेडबाबतचे अपडेट्स ग्राहकांच्या ईमेलवर दिले जात आहेत. ACT ग्राहक ACT Fibernet अॅपद्वारे किंवा ऑफर ईमेलद्वारे या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. App आणि ईमेलवर एक्स्ट्रा स्पीडसाठी एक बॅनर देखील आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काय आहे ऑफर :

ज्या युजर्सनी १०० Mbps पेक्षा कमी गती असलेल्या ब्रॉडबँड प्लानचे सदस्यत्व घेतले आहे त्यांना १०० Mbps च्या प्लॅनमध्ये अपग्रेड केले जाईल. त्याच वेळी, ज्या ग्राहकांनी १०० Mbps पेक्षा जास्त पण ३०० Mbps पेक्षा कमी प्लानचे सदस्यत्व घेतले आहे त्यांना ३०० Mbps ब्रॉडबँड प्लॅनमध्ये अपग्रेड केले जाईल. तर, दुसरीकडे, ज्यांनी ३०० Mbps पेक्षा जास्त पण ५०० Mbps पेक्षा कमी प्लानचे सदस्यत्व घेतले आहे त्यांना ५०० Mbps प्लानमध्ये अपग्रेड केले जाईल. कंपनी विद्यमान ५०० Mbps प्लान युजर्सना १ Gbps वर अपग्रेड करणार नाही.

ACT Fibernet बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि दिल्लीसह आठ शहरांमध्ये ब्रॉडबँड प्लान्स ऑफर करत असून ACT ACT Blaze सह विविध ब्रॉडबँड प्लान्स ऑफर करते. यात १५० Mbps स्पीड मिळत असून त्याची किंमत १,०८५ रुपये आहे. या प्लानमध्ये FUP म्हणजेच Fair User Policy डाउनलोड स्पीड १००० GB आहे. ACT Storm ३०० Mbps Speed देते. त्याची किंमत १,१८५ रुपये असून यामध्ये अनलिमिटेड स्पीड आहे.

ACT लाइटिंग आणि ACT Increadible ब्रॉडबँड Plans : यामध्ये अनुक्रमे ३५० Mbps आणि ४०० Mbps स्पीड उपलब्ध आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ACT Lighting ची किंमत १,४२५ रुपये आहे. त्याच वेळी, ACT Incredible ची किंमत १,९९९ रुपये आहे. यामध्ये अनलिमिटेड डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय, ACT Giga प्लान आहे. ज्याची किंमत ५,९९९ रुपये आहे. हे ५५०० GB च्या FUP मर्यादेसह सादर करण्यात आले आहे. ACT ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये असाच एक प्लान सादर केला होता, ज्यामध्ये युजर्ससाठी अतिरिक्त डेटा जाहीर करण्यात आला होता. या वर्षाच्या सुरुवातीला, ACT ने FUP मर्यादा वाढवण्यासाठी काही ब्रॉडबँड सेवा सुधारित केल्या. हा प्लान ७१० रुपयांपासून ५,९९९ रुपयांपर्यंत आहे.