टेक इट EASY

Paytm ची धमाकेदार ऑफर! ४ रुपये पाठवल्यास मिळेल १०० रुपये कॅशबॅक; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वापरामुळे ऑनलाइन व्यवहाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. फोनमध्येच डिजिटल वॉलेट अ‍ॅप असल्याने एका क्लिकवर पेमेंट करणे शक्य होते. भारतात Paytm अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. जर तुम्ही पेटीएम अ‍ॅप यूजर्स असाल तर तुमच्यासाठी कंपनीने खास कॅशबॅक ऑफर आणली आहे. कंपनीने २० फेब्रुवारी २०२२ पर्यंत पेटीएम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे आणि टी२० मॅच दरम्यान यूपीआय मनी ट्रान्सफरवर कॅशबॅक आणि अन्य गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. मॅचच्या दिवशी नवीन यूजर्सला ‘४ का १०० कॅशबॅक ऑफर’चा फायदा मिळेल. पेटीएम यूपीआयच्या माध्यमातून मनी ट्रान्सफर केल्यास १०० रुपयांपर्यंत कॅशबॅकचा फायदा मिळेल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याशिवाय यूजर्सला रेफ्रल प्रोग्राममध्ये भाग घेतल्यास अतिरिक्त कॅशबॅक जिंकण्याची संधी आहे. कोणताही यूजर मित्र अथवा कुटुंबातील सदस्याला यूपीआय मनी ट्रान्सफर करण्यासाठी पेटीएमचा उपयोग करण्यासाठी इनव्हाइट करतो, त्यावेळी रेफरर आणि रेफरी दोन्हींना १०० रुपये कॅशबॅक मिळतो. यूजर्सपर्यंत ऑफर पोहचवण्यासाठी पेटीएमने भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल, हरभजन सिंह आणि वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेलसोबत एक ऑनलाइन कॅम्पेन देखील सुरू केले होते.

यूजर्स आपल्या Paytm अ‍ॅपचा उपयोग करून काही मिनिटातच पेटीएम यूपीआयसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. हे अकाउंट थेट बँक खात्याशी कनेक्ट होईल व सुरक्षित पेमेंट करता येईल. याशिवाय लिंक केलेल्या अकाउंटमधील रक्कम देखील त्वरित तपासता येईल. तसेच, कोणत्याही यूपीआय क्यूआर कोडला स्कॅन करून पेमेंट देखील करता येते. पेटीएम पेमेंट्स बँक यूपीआय ट्रांझॅक्शनमधील सर्वात मोठ्या अ‍ॅपपैकी एक आहे. NPCI च्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२१ मध्ये विक्रमी ९२६ मिलियनचा व्यवहार झाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published.