Smartphone Hack झाला असल्यास देतो ‘हे’ Signal, दुर्लक्ष करणे पडेल महागात
टेक इट EASY

Smartphone Hack झाला असल्यास देतो ‘हे’ Signal, दुर्लक्ष करणे पडेल महागात

नवी दिल्ली: Warning Signs of Phone Hacking: आजकाल प्रत्येकजण मोबाईलचा वापर करत असून स्मार्टफोन हा जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. मोबाईलमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत यात दुमत नाहीच. पण त्याचबरोबर त्याचे धोकेही वाढले आहेत. अनेकदा कामानिमित्त युजर्स त्यांची महत्त्वाची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करतात. पण, ही माहिती सुरक्षित नसली तर मोबाईल हॅकिंगचा धोका सुद्धा वाढतो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ज्यामुळे तुमचा महत्त्वाचा डेटा चोरीला जाऊ शकतो. आणि तुम्हाला आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागू शकते. अनेक वेळा युजर्सना त्यांचा फोन हॅक झाल्याचेही कळत नाही. हॅकर्स तुमचा सर्व वैयक्तिक डेटा चोरून त्याचा गैरवापर करू शकतात. अशा अनेक घटना घडल्या आहे, ज्यामध्ये फोन हॅक करून हॅकर्सने युजर्सचे बँक अकाउंट काही मिनिटात रिकामे केले आहे.

मोबाईल हॅक झाला आहे हे कसे कळेल ?

कधी -कधी मोबाईलचा वेग अचानक कमी होतो किंवा फोन सतत हँग होऊ लागतो. अनेकदा फोन ठीक काम करता असतानाच अचानक हँग होतो. त्यावेळी स्मार्टफोनमध्ये मालवेअर असू शकते.
मोबाइल सेन्सर आणि बॅटरी:

वारंवार चार्ज करूनही फोनची बॅटरी संपत असल्यास. मोबाईल स्क्रीन बंद करूनही Apps काम करत असतील तर काळजी घ्या. याचा अर्थ कोणीतरी तुमचा मोबाईल हॅक करत आहे. फोनचे सेन्सर पुन्हा पुन्हा डिटेक्ट होतात . हे देखील मोबाईल हॅकिंगचे लक्षण आहे.

कॉल आणि एसएमएस:

बर्‍याच वेळा विशिष्ट अंक असलेल्या नंबरवरून युजर्सना कॉल येतात .तसेच, अनेकदा मेसेजेस सुद्धा येतात. युजर्स त्यावर क्लिक करतात. जे तुमचा मोबाइल हॅक करण्यासाठी पुरेसे आहे. असे होऊ नये यासाठी कोणत्याही मेसेज किंवा लिंकवर क्लिक करण्यापूर्वी खात्री करा.