३१ मार्चपूर्वी हे काम न केल्यास बंद होणार बँकिंग सर्व्हिस, पाहा डिटेल्स
टेक इट EASY

३१ मार्चपूर्वी हे काम न केल्यास बंद होणार बँकिंग सर्व्हिस, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: अलीकडेच एसबीआयच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एका ट्विटमध्ये बँकेने लाखो युजर्सना त्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एसबीआयने ट्विट करून ही माहिती दिली आहे. पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य आहे. बँकेने म्हटले आहे की, युजर्सना कोणताही अडथळा किंवा गैरसोय न होता बँकिंग सेवा वापरता यावी. म्हणूनच असे करण्याचा सल्ला दिला जात आहे. तुमचेही स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये खाते असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. जर एखाद्या युजरने तसे केले नाही. तर, अशा परिस्थितीत Pan Card निष्क्रिय होईल आणि एसबीआय वापरकर्त्यांच्या बँकिंग सेवांमध्ये व्यत्यय येऊ शकतो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तुम्हाला आर्थिंक व्यवहारांमध्ये अडचणी नको असतील तर लवकरात लवकर हे काम करावे लागेल. पाहा डिटेल्स.

आधी पॅन आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ सप्टेंबर ही निश्चित करण्यात आली होती. परंतु, नंतर ही तारीख ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली. तुम्ही अद्याप पॅन आणि आधार एकमेकांशी लिंक केले नसेल, वेळ अजूनही गेलेली नाही. पॅन कार्ड आधारशी ऑनलाइन लिंक करणे खूपच सोप्पी आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत साइटवर जावे लागेल. किंवा तुम्ही गुगल सर्चमध्ये https://www.incometaxindiaefiling.gov.in/home टाइप करू शकता. या लिंकवर जाताच तुम्हाला होमपेजच्या डाव्या बाजूला आधार लिंकचा पर्याय दिसेल. तुम्हाला आधार या लिंकवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल. ज्यामध्ये, तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक आणि तुमचा आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल, त्यानंतर आधार कार्डमध्ये नाव प्रविष्ट करा आणि मोबाइल नंबर भरा. जर तुमच्याकडे असलेल्या आधार कार्डमध्ये फक्त तुमचे जन्मवर्ष लिहिलेले असेल, तर तुम्ही आधारमध्ये i have only birth year हा पर्याय निवडावा. त्याच्या अगदी खाली, ‘Agree to Validate’ हा पर्याय निवडा. पर्याय निवडल्यानंतर, दिलेले सर्व तपशील एकदा नीट वाचा आणि नंतर लिंक आधार पर्यायावर क्लिक करा. तुमचे काम होईल.