तुम्ही टेलेग्राम अॅप वापरत आहात का? तर तुमच्यासाठी आहे महत्वाची बातमी
टेक इट EASY

तुम्ही टेलेग्राम अॅप वापरत आहात का? तर तुमच्यासाठी आहे महत्वाची बातमी

नवी दिल्ली : तुम्ही टेलेग्राम अॅप वापरत आहात का? वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. आता टेलेग्राम अ‍ॅपमध्ये नव्या वर्षात मोठे बदल होणार आहेत. पुढील वर्षापासून या अ‍ॅपच्या वापरासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागू शकतात. कारण, टेलेग्राम पुढील वर्षापासून पे फॉर सर्विस सुरू करणार आहे. कंपनीचे फाउंडर पावेल दुरोव यांनी याबाबत माहिती दिली. पण, ही पेड सेवा केवळ बिजनेस युजर्ससाठीच असेल. सामान्य युजर्स नेहमीप्रमाणेच फ्रीमध्ये या अ‍ॅपचा वापर करु शकतील.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टेलिग्राम प्लॅटफॉर्म विकण्याचा अजिबात विचार नाहीये, पण फंडिंगसाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या जे फिचर्स आहेत ते युजर्ससाठी मोफतच राहतील, असं पावेल दुरोव यांनी सांगितले आहे. आपल्या युजर्ससाठी टेलिग्राम नव्या वर्षात अनेक नवीन फिचर्स लाँच करणार आहे. ग्रुप चॅटला रिप्लाय, मेंन्शन स्मार्ट नोटिफिकेशन, अ‍ॅडव्हान्स पोल्स, अ‍ॅडमिन टूल, ग्रुप स्टॅटिक्स यांसारखे फिचर्स आणेल. नवीन व्हॉइस चॅट फिचरही कंपनी टेलिग्रामसाठी लवकरच लाँच करणार आहे. सध्या या अ‍ॅपचे जगभरात जवळपास 500 मिलियन अ‍ॅक्टिव्ह युजर झाले असून आता नवीन फिचर्स आणि बिजनेस कायम ठेवण्यासाठी कंपनी युजर्सकडून शुल्क आकारणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप हे सध्या जगभरात सर्वात जास्त वापरण्यात येणारे मेसेजिंग अॅप आहे. यामध्ये अनेक शानदार फिचर्स आहेत, पण असे काही फिचर्स टेलेग्राम अ‍ॅपमध्ये आहेत जे तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मिळत नाहीत. प्रायव्हसी हा त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा. याच कारणामुळे टेलेग्रामला अनेकांची पसंती असून व्हॉट्सअ‍ॅपसोबतच टेलेग्रामचीही डिमांड दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.