सौरऊर्जेवरच होणार चार्ज; इलेक्ट्रिक कार्सच्या बाजारपेठेत टोयोटाचा धमाकेदार प्रवेश
टेक इट EASY

सौरऊर्जेवरच होणार चार्ज; इलेक्ट्रिक कार्सच्या बाजारपेठेत टोयोटाचा धमाकेदार प्रवेश

नवी दिल्ली : जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेत आलेल्या टेस्ला या इलेक्ट्रिक कारमुळे या बाजारपेठेला चालना मिळाली असून भारतातील ग्राहक वर्गातही याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या इलेक्ट्रिक कार्सच्या बाजारपेठेत जपानची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टोयोटानं धमाकेदार प्रवेश केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टेस्लाच्या कार्सना टक्कर देण्यासाठी बीझेड 4 एक्स ही आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर केली आहे. शांघाय ऑटो शोमध्ये सोमवारी कंपनीनं ही एसयूव्ही सादर केली. येत्या 5 वर्षात नवीन 15 इलेक्ट्रिक कार्स बाजारात आणणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. ई-टीएनजीए प्लॅटफॉर्मवर ही कार तयार करण्यात आली असून केवळ इलेक्ट्रिक वाहनांसाठी हा प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात आला आहे.

या कारची ही आहेत खास वैशिष्ट्ये
शांघाय ऑटो शोमध्ये सादर करण्यात आलेल्या या एसयूव्हीमध्ये काही खास वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये साधारण स्टीअरिंग व्हीलऐवजी विशिष्ट आकारातील योक आहे. या कारची बॅटरी सौर ऊर्जेवर चार्ज केली जाऊ शकते. यामुळे ही कार इतर कार्सपेक्षा वेगळी ठरते. 2022 च्या मध्यापर्यंत ही कार विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध होऊ शकते.