टेक इट EASY

व्होडाफोन-आयडिया ही कंपनी आता ‘या’ नावाने ओळखली जाणार

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आणि आयडियाने आज त्यांच्या नावाचं रिब्रांडिंग केलं आहे. त्यामुळे आता ही कंपनी VI या नावाने ओळखली जाणार आहे. कंपनीने एका कार्यक्रमात ब्रॅन्ड आणि लोगो लॉंच केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या कंपनीचा मालकी हक्क यूकेच्या व्होडाफोन आणि आदित्य बिर्ला समूहाकडे आहे. 2018 मध्ये या कंपन्या एकत्र आल्या आणि त्यानंतर व्होडाफोन आयडिया नावाची कंपनी अस्तित्वात आली.

V व्होडाफोन आणि I हा आयडियासाठी लिहिला गेला आहे. या दोन्ही कंपनींनी आज त्यांच्यानवीन ब्रँडिंगची घोषणा केली. यावेळी विलीनीकरण हे या दोन ब्रँडचं आतापर्यंतचं जगातील सर्वात मोठं टेलिकॉम इंट्रीगेशन आहे. इतकंच नाही तर आता कंपनीने दर वाढणार असल्याचंही संकेत दिले आहेत.

दोन वर्षांपूर्वी व्होडाफोन आणि आयडियाचे विलीनीकरण झाले होते. तेव्हापासून, दोन्ही मोठ्या नेटवर्कला एकत्रित करण्याचे काम चालू होते आणि आता ते VI ब्रँड नावाने सादर केले जात आहे, असे कंपनीचे कार्यकारी अधिकारी रविंद्र टक्कर  यांनी सांगितले.

कंपनीने VI ब्रॅण्डअंतर्गत नवीन वेबसाइटही बाजारात आणली असून सरप्राइज ऑफर देखील जाहीर केली आहे. नवीन वेबसाइट www.myvi.in असेल. मात्र, जुनी वेबसाइटवर देखील काम सुरुच असणार आहे.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत