WhatsApp मध्ये येणार आतापर्यंतचे सर्वात महत्त्वाचे फीचर, दोन फोनमध्ये वापरता येईल एकच अकाउंट
टेक इट EASY

WhatsApp मध्ये येणार आतापर्यंतचे सर्वात महत्त्वाचे फीचर, दोन फोनमध्ये वापरता येईल एकच अकाउंट

नवी दिल्ली :WhatsApp New Feature: इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp यूजर्सला शानदार एक्सपीरियन्स देण्यासाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असते. गेल्याकाही दिवसात WhatsApp ने अनेक फीचर्स रोलआउट केले आहे. तसेच, यूजर्स ज्या फीचरची गेल्याअनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत, ते फीचर देखील लवकरच उपलब्ध होणार आहे. यूजर्सला सध्या एकच WhatsApp अकाउंट दोन स्मार्टफोनमध्ये वापरता येत नाही. परंतु, आता लवकरच ही समस्या समाप्त होणार आहे. WhatsApp एकच अकाउंट दोन फोनवर वापरता यावे, यासाठी फीचर जारी करणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कंपनीने काही महिन्यांपूर्वी मल्टी-डिव्हाइस फीचर जारी केले होते. परंतु, एक प्रायमरी डिव्हाइस व्यतिरिक्त इतर ३ ठिकाणी केवळ वेब व्हर्जनवरच याचा वापर करता येतो. इतर स्मार्टफोनमध्ये तेच WhatsApp अकाउंट उघडता येत नाही. दोन फोनमध्ये WhatsApp अकाउंट वापरण्यासाठी यूजर्सला वेगवेगळ्या ट्रिकची मदत घ्यावी लागते. परंतु, आता याची गरज नाही. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp नवीन फीचर Companion Mode वर काम करत आहे. या फीचरच्या मदतीने प्रायमरी डिव्हाइस व्यतिरिक्त अन्य डिव्हाइसवर देखील चॅट हिस्ट्रीला सिंक (synchronise) करता येईल. रिपोर्टनुसार, अँड्राइड व्हर्जन २.२२.१५.१३ साठी कंपनीने काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअ‍ॅप बीटामध्ये कंपेनियन मोड सादर केले आहे. स्क्रीनशॉटमध्ये व्हॉट्सअ‍ॅप कनेक्टेड डिव्हाइससह चॅट हिस्ट्रीला सिंक करताना दिसत आहे.

WhatsApp मध्ये लवकरच येणार हे नवीन फीचर

दरम्यान, WhatsApp आपल्या यूजर्सला शानदार एक्सपीरियन्स देण्यासाठी नवनवीन फीचर रोल आउट करत आहे. WhatsApp अनेक वेगवेगळ्या फीचर्सवर काम करत आहे. यात व्हिडिओ कॉल दरम्यान अवतारची निवड करणे, डिलीट मेसेज फॉर एव्हरीवनसाठी टाइम वाढवणे व अँड्राइडसाठी अ‍ॅनिमेटेड हार्ट इमोजी याचा समावेश आहे. इतरही अनेक फीचर्स लवकरच WhatsApp मध्ये पाहायला मिळतील.