राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने दिले हे आदेश
इतर बातमी मराठवाडा

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने दिले हे आदेश

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना कोर्टाने दणका दिला आहे. बलात्कार प्रकरणातील बी समरी रिपोर्ट औरंगाबादच्या जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. बलात्कार प्रकरणी पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे आदेश देताना न्यायालयाने पोलिसांवरही ताशेरे ओढले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेख यांच्यावर एक बलात्काराराच गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या या प्रकरणआवर औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी आज न्यायालयाने मेहबुब शेख यांच्यावर आरोप करण्यात आलेल्या बलात्कार प्रकरणातील बी समरी रिपोर्ट रद्द केला. तसेच या बलात्कार प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास कारा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

बलात्कार प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोबतच तपासावरुन पोलिसांवरदेखील ताशेरे ओढले आहेत. या बलात्कार प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करावी लागणार असल्यामुळे आता मेहबुब शेख यांच्या अडचणीत भर पडली आहे. तर दुसरीकडे मेहबुब शेख यांनी या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. हवं तर माझी नार्को टेस्ट करा, असं व्यक्तव्य यापूर्वी शेख यांनी केलेलं आहे.

काय आहे प्रकरण?
औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी या सगळ्या प्रकाराशी सबंध नसल्याचा खुलासा केला आहे. औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणीला महेबूब शेख याने भेटण्यासाठी बोलवून घेतले आणि त्यानंतर गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.