इतर

सोशल मिडीयाचा अतिवापर करताय? मग वेळीच सावध व्हा; नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम

कोविड-१९ महामारीला सुरवात झाल्यापासून लोकांनी सोशल मिडीयावर सर्वाधिक वेळ घालवला असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून लोकांनी ट्विटरवर 24% आणि फेसबुकवर 27% अधिक वेळ घालवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे हे व्यसन होत चालले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

क्लिनिकल अँड सोशल सायकोलॉजीच्या जर्नलमधील पब्लिक रिसर्चनुसार, सोशल मीडियाच्या व्यसनाचा चिंता आणि नैराश्याशी थेट संबंध आहे. त्याचा जास्त वापर केल्याने कार्टिझोल आणि एड्रेनालाईन हार्मोन्सची पातळी वाढते. हे मुख्य ताणतणाववाढविणारे मुख्य हार्मोन्स आहेत.

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती स्क्रीनवर खूप वेळ काम करते. तेव्हा त्याच्या डोळ्यांची उघडझाप करण्याचा वेग 70% पर्यंत कमी होतो. त्याचा थेट परिणाम डोळ्यांवरही होतो. आरोग्य मासिक हेल्थलाइनने, सोशल मीडियाचे व्यसन टाळण्यासाठी काही मार्गांची माहिती दिली आहे. तसेच, याचा अतिवापर करण्याचे धोकेही सांगितले आहेत, जे आपल्याला माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मनातील आनंदासाठी डिजिटल डिटोक्सचे चार मार्ग

1. सोशल मीडिया मोबाईलवर नव्हे तर संगणकावर वापरा
जे अ‍ॅप्स जास्त गरजेचे नाही त्या अ‍ॅप्सच्या सेटिंग्जमध्ये जाऊन त्याचे नोटीफिकेशन बंद करा. म्हणजे फोन पुन्हा पुन्हा बीप करणार नाही. त्यामुळे तुमची वारंवार फोन तपासण्याची सवय टाळण्यास मदत होईल.

2. काम नसलेल्या अ‍ॅप्सचे नोटीफिकेशन बंद करा
आपल्याला सोशल मीडियापासून दूर रहायचे असेल तर प्रथम आपला दररोजच्या स्क्रीनची वेळ जाणून घ्या. मोबाईलमधून सोशल मीडिया अॅप्स काढून लॅपटॉप किंवा संगणकाद्वारे सोशल मीडिया वापरा.

3. सोशल मीडियासाठी विशिष्ट वेळ सेट करा
सोशल मीडिया खूप महत्त्वपूर्ण वाटतो, म्हणून आपण त्यासाठी एक विशिष्ट वेळ सेट करू शकता. याचा परिणाम आपल्या कामाच्या उत्पादकतेवरही होणार नाही.

4. नियम बनवा, नवीन छंद विकसित करा, मित्रांना भेटायला सुरवात करा
फोनच्या सवयीपासून मुक्त होण्यासाठी घरातच काही नियम बनवा. जसे की, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणावेळी फोन पूर्णपणे बंद करणे. झोपेच्या वेळी फोन बेडरूमच्या बाहेर ठेवणे हा देखील एक पर्याय असू शकतो. त्याचप्रमाणे काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. आवडते खेळ खेळण्यास सुरवात करा. फोनद्वारे नव्हे तर थेट मित्रांना भेटण्याचा प्रयत्न करा.

सोशल मिडीयाच्या अतिवापराचे धोके

पोस्ट लाईक केल्याचा आनंद नंतर व्यसनात बदलतो
जेव्हा आपण आपल्या आवडत्या अ‍ॅपवर लॉग इन करता तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन सिग्नल वाढतात. हे न्यूरोट्रांसमीटर थेट सुख आणि आनंदाशी संबंधित आहेत. जसजसे आपण सोशल मीडियाचा वापर वाढवितो तसे आपल्या मेंदूत डोपामाइनची पातळी वाढते. या परिस्थितीत तुमचा मेंदू ही प्रक्रिया स्वतःसाठी एक आत्मसात करून घेते, त्यामुळे फोनवर वारंवार वेळ घालवण्याची प्रक्रिया घडते.

जेव्हा आपण एखादी पोस्ट सोशल मिडीयावर शेअर करता आणि त्यासाठी तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळत जातो, तेव्हा हा आनंद अधिक वाढत जातो. परंतु मुख्य म्हणजे ही सकारात्मक भावना केवळ थोड्या काळासाठीच असते. यानंतर, आपल्या मेंदूत डोपामाइनचा प्रभाव कमी होताच, आपण पुन्हा सोशल मीडियावर पोहोचता. मग ते पुन्हा पुन्हा होण्यास सुरवात होते. मेंदूला या भावना इतर व्यसनांमध्येही होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *