इतर राजकारण

या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे : चंद्रकांत पाटील

मुंबई : शिवसेनच्या मुखपत्र असलेल्या सामना’ च्या अग्रलेखातून अलीकडे सतत भाजपा आणि भाजपा नेत्यांवर टीका केली जाते. अलीकडे सामनाच्या अग्रलेखात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका-टिप्पणी केली गेल्यामुळं ते नाराज झाले आहेत. यामुळे पाटील लवकरच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहोत. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, ” “सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात..अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली तिथे रश्मी वहिनी असणारं संपादकीय असू शकत नाही”.

सामना’च्या अग्रलेखातून माझ्याविरोधात गलिच्छ लिखाण केलं जातं. मागे औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याविषयी मी जेव्हा बोललो, तेव्हा माझ्याविरुद्ध लिहिलं गेलं. ज्यावेळी हे गोधड्या भिजवत होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी ही मागणी केली होती, असं अग्रलेखात म्हटलं गेलं होतं. अलीकडंच संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आली. त्यानंतरच्या अग्रलेखातही वाईट भाषा वापरण्यात आली होती. त्याबद्दल मी रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे. रश्मी वहिनी संपादक असलेल्या वृत्तपत्राचं असं संपादकीय असू शकत नाही,’ असं पाटील म्हणाले.

“औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसंच निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? ते पहिले हटवा. संभाजी महाराजांचं नाव हे संभाजीनगर शहराला असणं याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती. पाच सहा महिन्यांपूर्वी जेव्हा मी संभाजीनगर नामांतर व्हावं असं म्हटलं होतं तेव्हा सामनाने माझ्यावर अग्रलेख लिहिला होता,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, शिवसेनेनं आता बाळासाहेबांची मागणी लावून धरावी. काँग्रेसनं नामांतराला विरोध केलाय. त्यावर शिवसेनेनं काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्यातील विसंवादाचं आम्हाला घेणंदेणं नाही. आमची भूमिका ठरलेली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर व्हायलाच पाहिजे,’ असं पाटील म्हणाले. त्याचबरोबर “नवीन वर्षात अध्यक्ष म्हणून खूप प्रवास करुन संघटन मजबूत करण्याचा माझा संकल्प आहे. २०२२ साली मुंबईसह पालिका निवडणुका लढवणे, जिंकणे हादेखील संकल्प आहे. तसंच त्यातही मुंबईवर दिल्लीचंही लक्ष राहील. मुंबईच्या पायाभूत समस्यांकडे दुर्लक्ष करणं आणि पैसे गोळा करणं एवढंच लक्ष राहिलं आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *