मा. खासदार सुनील गायकवाड यांनी राज्यपालांची घेतली भेट; विद्यार्थ्यांसाठी केली ही मागणी
इतर

मा. खासदार सुनील गायकवाड यांनी राज्यपालांची घेतली भेट; विद्यार्थ्यांसाठी केली ही मागणी

मुंबई : लातूर लोकसभेचे माजी खासदार डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांनी आज राज्यपाल भवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांची भेट घेतली. नुकत्याच 17 फेब्रुवारी पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा सुरू आहेत या परीक्षा ऑनलाइन असल्यामुळे आणि औरंगाबाद व मराठवाड्यात या आठवड्यात इंटरनेट डीस कनेक्टिविटी यामुळे अनेक विद्यार्थी हे परीक्षेपासून वंचित राहिले आहेत त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेस बसण्याची संधी द्यावी ज्यांना इंटरनेटमुळे परीक्षेला बसता आले नाही अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात यावी अशा मागणीचे पत्र लातूरचे माजी खासदार व विश्व दलित परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सुनील गायकवाड यांनी राज्यपाल यांना दिले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यपाल यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी तात्काळ औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंची फोनवर या विषयावर सूचना दिली आणि या संदर्भात सुनील गायकवाड हे आपणाला भेटतील त्यांच्याशी चर्चा करून आपण योग्य निर्णय घ्यावा अशा सूचना राज्यपाल यांनी कुलगुरूंना दिल्या.

माजी खासदार गायकवाड यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे विशेष आभार व्यक्त केले आणि काही विषयावर चर्चा केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या हेतूने पुन्हा परीक्षा घ्याव्यात अशी विनंती केली.