इतर राजकारण

महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल म्हणणाऱ्या भाजपाला रोहित पवारांचे सणसणीत प्रत्युत्तर

नाशिक :  महाविकास आघाडी सरकारला ५ वर्षे कधी होतील हे तीन-तीन महिने म्हणणाऱ्या भाजपला देखील समजणार नाही. अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला तिला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे सतत म्हणणाऱ्या भाजपावर रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. रोहित पवार नाशिकमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, ” राजकारणात आल्यापासून नाशिकला येण्याची ही सहावी-सातवी वेळ आहे. पवार साहेबांवर या जिल्ह्याचं विशेष प्रेम असल्याने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. महाविकास आघाडी हा एक प्रयोग आहे. मात्र, विरोधक हे केवळ विरोध करण्याचे काम करत आहेत. विरोधकांच्या सोशल मीडिया टीमला आर्थिक बळ आहे.

विरोधकांकडून छोटे-छोटे विषय लोकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बिंबवले जात आहेत. भाजपच्या सोशल मीडियाला तितक्याच ताकदीने उत्तर द्यायला हवे, असेही पवार म्हणाले. राज्य सरकारचा जीएसटीचा वाटा केंद्र सरकार देत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारने कर्जमाफीतही राज्याला आणि शेतकऱ्यांना फसवले, असा आरोपही त्यांनी केला.

पार्थ पवार आमदरकीची निवडणूक लढवणार का? यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले, पार्थ पवार यांना उमदेवारी द्यायची की नाही, याबाबत शरद पवार साहेब, अजितदा आणि तिथले पालकमंत्री निर्णय घेतील. कार्यकर्ते बोलून जातात पण निर्णय नेते घेत असतात. योग्य तो न्याय तिथे असलेल्या लोकांना दिला जाईल, असा विश्वास देखील रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. परिस्थिती आणि कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेतली जाईल. कोणी अशी मागणी केली, म्हटलं म्हणून लगेच ती पूर्ण होईलच असंही होत नाही, असंही रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, आता दुसरीकडे पंढरपूरमध्ये रोहित पवार यांचे बंधू आणि अजित पवार यांचे सुपूत्र हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंढरपुरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंढरपूरमध्ये रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवार यांना जर उमेदवारी दिली तर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय हा आणखी सोपा होईल असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *