इतर

तामिळनाडूत पेट्रोल स्वस्त करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : पेट्रोलनं अनेक राज्यांमध्ये शंभरी पार केली आहे. त्यातच तामिळनाडू सरकारनं सामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर ३ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूचे अर्थमंत्री पी. थैगा राजन यांनी शुक्रवारी विधानसभेत ही घोषणा केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तामिळनाडुत २.६ कोटी लोकं दुचाकी वापरतात. सामान्य नागरिकांचा विचार करता आम्ही पेट्रोलच्या किंमती ३ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारला १,१६० कोटींचा तोटा सहन करावा लागणार आहे, असं अर्थमत्री पी. थैगा राजन यांनी सांगितलं.

असे आहेत देशातील प्रमुख शहरातील पेट्रोलचे दर
दिल्ली – १०१.८४ रुपये
मुंबई – १०७.८३ रुपये
कोलकाता – १०२.०८ रुपये
चेन्नई – १०२.४९ रुपये

असे आहेत देशातील प्रमुख शहरातील डिझेलचे दर
दिल्ली – ८९.८७ रुपये
मुंबई – ९७.४५ रुपये
कोलकाता – ९३.०२ रुपये
चेन्नई – ९४.३९ रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *