वायरल झालं जी

भयानक! हेलिकॉप्टर आणि विमानाची हवेत धडक; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : विमान आणि हेलिकॉप्टर यांची हवेत समोरासमोर धडक झाल्याची घटना शुक्रवारी अमेरिकेत घडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून विमानतळावरील वाहतूक सध्या बंद आहे. अमेरिकेतील एरिजोना विमानतळावर हवेत उड्डाण करणाऱ्या विमानाची आणि हेलिकॉप्टरची समोरासमोर टक्कर झाली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर हेलिकॉप्टर क्रॅश होऊन जमिनीवर कोसळलं तर विमान सुरक्षितपणे लँड करण्यात वैमानिकाला यश आलं. या अपघातात हेलिकॉप्टरमधील दोघांचा मृत्यू झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैकलिमंस शहराच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. विमानाचा दोन इंजिने असल्यामुळे अपघातानंतर दुसऱ्या इंजिनाचा वापर करून सुरक्षित लँडिंग करण्यात पायलटला यश आलं. तर हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यामुळे ते जमिनीवर कोसळलं. अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला होता. तातडीनं ही आग विझवण्यात यश आलं. विमानाचं संचलन फ्लाईट ऑपरेशन्स अकॅडमीकडे होतं. तर हेलिकॉप्टर चालवण्याचं प्रशिक्षण क्वांटम हेलिकॉप्टर नावाची संस्था करत होती. या दोन्ही प्रशिक्षण संस्था असून त्या विमानं आणि हेलिकॉप्टर उड्डाणाचं प्रशिक्षण देतात. प्रशिक्षणासाठी चार आसनक्षमता असणाऱ्या विमानाचा वापर केला जातो. अपघातावेळी या विमानात दोन जणच होते. राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्डाकडून या अपघाताची चौकशी केली जात आहे.

विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण सुरु असतानाच हा अपघात घडला असून हेलिकॉप्टर आणि विमान या दोन्हींचं संचलन विद्यार्थीच करत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. समोरासमोर झालेल्या या अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टरचे अवशेष विमानतळाच्या परिसरात कोसळले. मात्र त्यात कुणीही जखमी झालं नसल्याची माहिती आहे. सुरक्षेसाठी काही काळ विमानतळ बंद ठेवण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published.