Truck
वायरल झालं जी

पोलिसांनी ट्रक पकडला, गेला थेट केंद्रीयमंत्र्यांना फोन अन् मग सर्वच पोलिस निलंबित

नवी दिल्ली : पोलिसांनी गाडी पकडून पावती झाल्याचा प्रकार हा काही नवा नाही. काहीना काही कारण देत पोलिसांकडून पावती होतेच, याचीही अनेक उदाहरणे आहेत. पण अशाचप्रकारे पावती करणे एका पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजस्थानमधील तेलाचे व्यापाऱ्यांचा एक ट्रक पडकला होता. या ट्रकमध्ये 15 तेलाचे ड्रम होते. हा ट्रक आग्रामार्गे येत होता. जेव्हा हा ट्रक आग्रा बायपाय येथून येत होता. तेव्हा स्थानिक पोलिसांनी हा ट्रक थांबवला आणि चालकाकडे एक हजार रुपयाची मागणी केली. सर्व कागदपत्रे जवळ असल्याने चालकाने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी तो ट्रक थेट पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले. हा ट्रक ठाण्यात नेल्याने तिथं 25 हजारांची पावती केली.

घडलेला हा प्रकार व्यापाऱ्याचे मुनशी आणि ट्रकचालकाने आपल्या व्यापारी मालकाला सांगितला. तेव्हा व्यापाऱ्याने थेट केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना हा प्रकार सांगितला. तेव्हा मंत्रीमहोदयांनी उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालकांना फोन केला. त्यानंतर डीजीपींनी एडीजी यांना कल्पना दिली आणि चौकशीचे आदेश दिले. चौकशीनंतर पोलिसच यामध्ये दोषी असल्याचे आढळले. त्यामुळे एसएसपींनी या ठाण्यातील पाचही पोलिसांनी निलंबित केले. त्यानंतर खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहे.

दरम्यान, याबाबतचा व्हिडिओ यूट्यूब चॅनेल ट्रान्सपोर्ट टीव्हीवर दिला गेला आहे. त्यानंतर याची माहिती समजली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत