दिल्लीतील आंदोलनाची जाहिरात अमेरिकेच्या टिव्हीवर; व्हिडीओ व्हायरल
वायरल झालं जी

दिल्लीतील आंदोलनाची जाहिरात अमेरिकेच्या टिव्हीवर; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे जहिरात आता अमेरिकेतील टीव्हीवर दाखविण्यात येत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अमेरिकेतील फुटबॉल लीगच्या दरम्यान भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची जाहिरात टिव्हीवर दाखवण्यात आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी विदेशातील नामांकित व्यक्तींनी आपले मत व्यक्त केले होते. सोशल मीडियावर दावा करण्यात आला आहे की, हा व्हिडीओ अमेरिकेमध्ये दाखवण्यात आला आहे. ही व्हिडीओ क्लिप ४० सेकंदांची आहे. या व्हिडीओमध्ये भारतामध्ये ज्या नवीन कृषी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, तो परत घेण्याची अपील करण्यात आली आहे. य व्हिडीओमध्ये मार्टिन लूथर किंग जूनियर यांच्याही काही ओळी आहेत.

हा व्हिडीओ ट्विटरवरील वेरिफाइड अकाउंट्स असलेल्या व्यक्तींनीही पोस्ट केला आहे. सिमरनजीत सिंह यांनी ट्विटवर लिहिले आहे की, “ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची जाहिरात आहे. जप तुम्ही हा व्हिडीओ आतापर्यंत ऐकला नसेल तर ऐकण्याची वेळ आता आली आहे. भारतीय शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.” अमेरिकेमध्ये फुटबॉलच्या सुपर बाऊल लीगदरम्यान ही जाहिरात दाखवण्यात आली होती आणि आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.