नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या! अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकून गोवेकर झाले खुश
वायरल झालं जी

नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या! अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकून गोवेकर झाले खुश

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. त्यांची गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. अनेकदा कार्यक्रमांमध्येही त्यांना गाणं गाण्याचा आग्रह केला जातो. याच पार्श्वभूमीवर गोव्यात झालेल्या एका कार्यक्रमात आमृता फडणवीस यांनी गाणं गायलं. त्यांनी आशिकी २ या बॉलिवूड चित्रपटातलं हम तेरे बिन अब रह नहीं सकते हे गाणं गायलं. त्यांचं गाणं ऐकताच प्रेक्षकांनी देखील टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्याचं कौतुक केलं. या गाण्याचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

https://www.instagram.com/reel/Cln8cd-AXDM/?utm_source=ig_embed&ig_rid=f3b905dc-ce41-442b-8021-c075d65ea1d0

भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं गोव्यात एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांनी देखील हजेरी लावली होती. दरम्यान उपस्थित प्रेक्षकांनी त्यांच्याकडे एका गाण्याची विनंती केली. अन् त्यांनी देखील प्रेक्षकांच्या आग्रहाखातर गाणं सादर केलं. त्यांनी हम ‘तेरे बिन अब रह नहीं सकते’ हे गाणं गायलं. हे गाणं आशिकी २ चित्रपटात अरजित सिंगनं गायलं आहे. हा चित्रपट तुफान गाजला होता. विशेषत: या चित्रपटातील गाण्यांनी विषेश लोकप्रियता मिळवली होती. अमृता फडणवीस यांनी हे गाणं गायला सुरुवात करताच स्टेजवर उभे असलेले पाहुणे मंडळी देखील त्यांच्या मोठमोठ्या टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देऊ लागले. प्रेक्षक शिट्ट्या मारून त्यांचं कौतुक करत होते. हे गाणं ऐकून तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.