वायरल झालं जी

आसाममध्ये पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘एसबीआय’ ने सुरु केल्या फ्लोटींग बँक; पहा व्हायरल व्हिडीओ

जगावर कोरोनाचे संकट कोसळले असून, भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, मागच्या २४ तासात देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वोच्च वाढ नोंदवली गेली आहे. यादरम्यान, आसाम राज्य कोरोना आणि पूर अशा दुहेरी संकटाचा सामना करत आहे. राज्यात पूर परिस्थीतीमध्ये संकटचा सामना करत असलेल्या नागरीकांच्या मदतीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने पुढाकार घेतला आहे. स्टेट बँकेने थेट तरंगणाऱ्या बँक शाखा सुरु करत पुरग्रस्तांना मदत करणे सुरु केले आहे. अशाच एका शाखेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

ज्या भागामध्ये पूर परिस्थिती आहे त्या गावात ही बँक पोहचत असल्याचा व्हिडीओ स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पेस्ट केला आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी पुराचा फटका बसलेल्या गावातील लोकांना बँकेच्या सेवा पुरवण्यासाठी आणि या कठीण काळामध्ये या गावकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपण सगळे मिळून या संकटातूनबाहेर पडू असा संदेश या व्हिडीओसोबत देण्यात आला आहे आहे.

एसबीआयने सुरु केलेल्या या फ्लोटींग बँकमध्ये बोटीवर तंबूमध्ये बँके सुरु करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये बोटीवरील बँकेचे कर्मचारी लॅपटॉपवरुन स्थानिकांना मदत करत आहेत. बँकेच्या शाखेत पासबुक घेऊन थांबलेल्या महिलांची रांग देखील दिसत आहे. त्या गावातील महिलांचे काम झाल्यानंतर ही शाखा पुढे निघूण जाते. या फ्लोटिंग बँकेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत असून लोक या कल्पनेचे कौतुक करत आहेत.