उत्तरप्रदेशात पुणे पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला; व्हिडिओ व्हायरल
वायरल झालं जी

उत्तरप्रदेशात पुणे पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला; व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याचे कर्मचारी समीर सय्यद यांच्या हत्येप्रकरणी तपासासाठी उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर जमावाने भीषण हल्ला केल्याची घटना घडली आहे. जमावाने पोलिसांवर कोयत्या आणि लाठ्या काठ्याने हल्ला चढवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस स्टेशनमधील कर्मचारी समीर सय्यद यांची 5 मेच्या रात्री निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणातील तपासासाठी फरासखाना पोलीस स्टेशनमधील पथक गाझियाबादमध्ये गेलं होते. आरोपी प्रवीण महाजनची प्रेयसी गाझियाबादला पळून गेली होती. तिला आणण्यासाठी पोलीस तिथे पोहोचले होते. पण, जमावाने पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढवला. पोलीस कर्मचाऱ्यांना लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली.

या व्हिडीओमध्ये जमावातील काही तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्याला घेरले असून जमिनीवर पाडून लाथाबुक्याने मारहाण करत आहे. या तरुणाच्या हातात कोयते आणि लोखंडी रॉड दिसत आहे. या जमावाने पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली आहे. या हल्लात पोलीस जखमी झाले आहे.

काय आहे प्रकरण?
फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस हवालदार समीर सय्यद यांची 5 मे रोजी मंगळवारी रात्री 1 वाजता प्रवीण महाजन याने चाकूने गळा चिरून हत्या केली होती. प्रत्यक्षात बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या एका महिलेच्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली होती. समीर सय्यद हे आरोपी महाजन याच्याशी प्रेमसंबंध असलेल्या महिलेला संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होते. त्यावरून महाजन आणि सय्यद याच्यात दीड महिन्यापूर्वी जोरदार वादावादीही झाली होती. तोच राग डोक्यात धरून महाजन याने सय्यद यांचा खून केला, असावा असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

या प्रकरणी प्रवीण महाजनला पोलिसांनी अटक केली होती. प्रवीण महाजन हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल आहे. त्यामुळे प्रवीण महाजन हा एक वर्षासाठी तडीपार आहे. तडीपार असताना त्याने पुण्यात येऊन सय्यद यांचा खून केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील महिला शोधून तिचा जबाब घेणे गरजेचं होतं, यासाठी पुणे पोलीस हे गाझियाबाद इथं गेलं होतं.