धक्कादायक! संसदेत सेक्स, हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ लीक
वायरल झालं जी

धक्कादायक! संसदेत सेक्स, हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ लीक

कॅनबरा: संसदेत खासदार आणि कर्मचाऱ्यांच्या सेक्स, हस्तमैथुनाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर ऑस्ट्रेलियात तीव्र संतापाची प्रतिक्रिया उमटली असून पंतप्रधान स्कॉट मॉरिसन सरकार हादरले आहे. व्हिडिओ लीकनंतर सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत चित्रीत करण्यात आलेला सेक्स व्हिडिओ एका ग्रुप चॅटमध्ये शेअर करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडिओ कोणीतरी लीक केला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ऑस्ट्रेलियातील नागरिकांना धक्काच बसला. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महिला खासदाराच्या बाकाजवळ हस्तमैथुन करत असल्याचे दिसत होते.

व्हिडिओ लीक करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, कर्मचारी आणि खासदारांकडून प्रार्थना कक्षाचा वापर सेक्स करण्यासाठी करण्यात येतो. सेक्ससाठी वेश्यांनाही संसदेच्या इमारतीत आणले असल्याचा धक्कादायक आरोप त्याने केला. कर्माऱ्यांमध्ये नेहमीच सातत्याने अश्लील छायाचित्रे पाठवली जात असतात, असेही त्याने सांगितले आहे. संपूर्ण देशात आरोपींविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात ऑस्ट्रेलियाच्या महिला खासदारही सहभागी झाल्या होत्या. सरकारने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करायला हवी अशी मागणी मंत्री मरिसे पायने यांनी केली.