वायरल झालं जी

३०० किमी प्रतितास वेगानं चालवली बाईक; व्हिडीओ व्हायरल झाला अन् झालं असं काही..

बंगळुरु: कोरोना महामारीच्या काळात लोक घरात अडकले आहेत, त्यामुळे रस्त्यांवर गर्दी कमी आहे. याचाच गैरफायदा घेत यामाहा R1 गाडी ३०० किलोमीटर प्रतितास वेगानं चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये अशा धोकादायक पध्दतीने गाडी चालवणं त्या व्यक्तीला चांगलंच माहागात पडलं आहे. पोलिसांनी त्याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनच्या काळात बेंगळूरुमधील सुपरबाईक चालकाने रस्त्यावर चालणाऱ्या लोकांचा जीव धोक्यात घालत ३०० किलोमीटर प्रतितास वेगानं गाडी चालवण्याचा हा सेल्फी व्हिडीओ तयार केला होता. वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगानं गाडी चालवण्याचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. पोलिसांनी व्यक्तीचा शोध घेतला तसेच त्याची गाडी जप्त करत त्याला अटक केले आहे.

मुनियप्पा असं बाईक चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव असून बंगळुरु येथील ई-सिटी फ्लायओव्हरवर ३०० किमी प्रतिसास वेगाने गाडी चालवली होती आणि घटनेचा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता. हाच व्हिडीओ पोलीस सहआयुक्त संदिप पाटील यांनी हा ट्विट केला आहे. त्यांनी “या चालकाचा ३०० किमी वेगाने ई-सीटी फ्लायओव्हरवर गाडी चालवातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याला सीसीबीने शोधून काढले आहे आणि Yamaha 1000cc गाडी जप्त करण्यात आली” अशी माहिती त्यांनी दिली होती.