वायरल झालं जी

बोलेरोचा तो व्हिडिओ झाला व्हायरल; महिंद्रांनाही आवरला नाही शेअर करण्याचा मोह

दररोज  घडलेल्या अपघाताचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट होत असतात. यादरम्यान महेंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी एक बोलेरो गाडीचा असाच व्हायरल व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकांउटवरुन पोस्ट केला आहे.  या व्हिडीओमध्ये बोलेरो गाडीमुळे एका दुचाकीस्वाराचा जीव वाचला आहे.

या अपघाताच्या दरम्यान “बोलेरो कार ही जींवत झाल्यासारखं वाटत आहे, गाडीचा एकमेव उद्देश दुचाकीस्वाराला वाचवणं हा होता” असं महिंद्रा यांनी ट्विट केलं आहे. व्हिडिओला याआधीच १.६ मिलियन (१६ लाख) हून अधिक जास्त वेळा पाहिला गेला आहे. ही घटना २५ जुलै रोजी सकाळची आहे. अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे बोलेरो कारने सोशल मिडीयात देखील लोकांची मने जींकली आहेत.

रस्त्यावर वेगाने जात असलेल्या एका जेसीबी मशीनचे अचानक नियंत्रण सुटले आणि त्यामुळे जेसीबी मशीन रस्ता सोडून ती वेगाने जात रस्त्याच्या कडेला उभा राहिलेल्या दुचाकी चालकाला धडकणार तेवढ्यात समोरुन आलेल्या बोलेरो एसयूव्ही जेसीबीला टक्कर दिली. जेसीबी वेळेत थांबल्याने दुचाकी चालकाचा जीव वाचला. त्याबद्दल सोशल मिडीयात बोलेरो गाडीचे कौतुक होत आहे.