वायरल झालं जी

लाच दिली नाही म्हणून अंड्यांनी भरलेली हातगाडी केली पलटी; पहा व्हिडीओ

इंदौरः कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लहान-मोठ्या उद्योगांचे खूप नुकसान होत आहे. हातावर पोट असणाऱ्या मजूरांचे या काळात हाल होत आहेत. अशा कठिण परिस्थितीत इंदौर येथे महापालिका कर्मचाऱ्यांनी लाच मिळाली नाही म्हणून १४ वर्षाच्या मुलाची अंड्यांनी भरलेली हातगाडी रस्त्यावर पलटी केल्याच्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

आपण १०० रुपयांची लाच देण्यास नकार दिल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी गाडी पलटी करुन अंड्यांची नासधूस केल्याचा आरोप मुलाने केला आहे. त्याने सांगीतलं की, त्याने सकाळपासून हातगाडी त्या जागेवर उभी केली होती, महानगरपालिकेतचे कर्मचारी आले आणि हातगाडी दुसरीकडं घेउन जा नाहीतर ती जप्त करण्यात येईल असे सांगीतले. ते १०० रुपयांची मागणी करत होते. पैसे न दिल्याने त्यांनी हातगाडी पलटी करुन सर्व अंड्यांची नासधूस केला.

 

हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात राग व्यक्त करत आहेत. या व्हिडीओत तो १४ वर्षाचा मुलगा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर संतापलेला दिसत आहे. तर सोशल मिडीयावर लोक देखील त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करत आहेत.