वायरल झालं जी

नवरदेवाला पाहून नवरीचा धिंगाना; भन्नाट डान्सचा व्हिडिओ एकदा पाहाच 

मुंबई : नवरदेव येताच त्याला पाहण्याची इतकी उत्सुकता झाली नवरी स्वतःवर ताबा ठेवू शकली नाही. इतर नवरींप्रमाणे लग्नमंडपात नटूनथटून लाजत बसून नवरदेवाची प्रतीक्षा न करता ती लग्नमंडप सोडून रस्त्यावरच आली. सोशल मीडियावर लग्नाचा भारी व्हिडीओ व्हायरल होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नवऱ्याला पाहून नवरीला इतका आनंद झाला की ती स्वतःच त्याच्या स्वागतासाठी आली. लग्नमंडप सोडून ती रस्त्यावरच धावत गेली आणि तिथं तिने धिंगाणा घातला. तिने रस्त्यावर असं काही केलं की तिला पाहून नवरदेव तसाच स्तब्ध उभा राहिला. नवरीचं रूप पाहून त्याला काही सुचेना. नवरदेवासमोर नवरीने ठुमके लगावले. अगदी बिनधास्त, जोशात ती नाचताना दिसते आहे. अगदी हटके पद्धतीने तिने नवरदेवाचं स्वागत केलं आहे. नवरीचं हे रूप पाहून नवरदेवही शॉक झाला. मांडवदारी आलेल्या वरातील नवरीने भारीच डान्स केला.

हा व्हिडीओ नेटिझन्सच्या चांगल्याच पसंतीस पडला आहे. नवरीचा डान्स, नवरदेवाचं स्वागत करण्याची तिची हटके स्टाइल आणि बिनधास्त अंदाज सर्वांना भावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.