वार्तांकन करणाऱ्या बातमीदारासोबत हत्तीने केली चेष्टा, व्हिडीओ होतोय व्हायरल
वायरल झालं जी

वार्तांकन करणाऱ्या बातमीदारासोबत हत्तीने केली चेष्टा, व्हिडीओ होतोय व्हायरल

नवी दिल्ली- जगभरातील अनेक मीडिया हाऊसमधील पत्रकार कोरोनाच्या सावटामुळे घरूनच लाईव्ह येतात. घरी असताना लाईव्ह करण्यासाठी अनेक अडचणी येत असतात. कधी लहान मुलं मध्ये येतात, तर कधी बायकोचा गोंधळ दिसून येतो. मात्र एका पत्रकाराला फिल्डवर गंमतीदार प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या हा गंमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हत्तीचे साधारण गंमतीदार किंवा चिडलेल्या रुपातले अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण लाईव्ह शो दरम्यान हत्तीने केलेला कारनामा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 

एक पत्रकार हत्तीला आणलेल्या ठिकाणहून वार्तांकन करत असताना अचानक हत्तीला मस्ती सुचली आणि त्यानं सोंडेनं जोरात वर लावलेल्या पताक्यांवर हवा सोडली. दोन सेकंदासाठी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारालाही काही सुचेना तो ओरडत बाजूला झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 35 हजारहून अधिक लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला असून 33 हून अधिक जणांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे.