धक्कादायक विडिओ : लग्नात पापडसाठी तुफान हाणामारी, सहा जण जखमी
वायरल झालं जी

धक्कादायक विडिओ : लग्नात पापडसाठी तुफान हाणामारी, सहा जण जखमी

तिरुअनंतपुरम : लग्नात पापडसाठी तुफान हाणामारी झाल्याचं तुम्ही नक्कीच ऐकलं नसेल. असाच एक धक्कादायक प्रकार केरळमधील अलप्पुझा येथून समोर आला आहे. लग्नात पापडावरून मोठा वाद झाला. यात नवरी आणि नवरदेवाकडील लोकांमध्ये जोरदार भांडणं झालं. आता या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पापडावरून झालेल्या भांडणात सहा जण जखमीही झाले आहेत. वराच्या कुटुंबातील काही सदस्यांनी जास्तीचे ‘पापड’ मागितले मात्र त्यांना नकार देण्यात आला यानंतर ही हाणामारी सुरू झाली. दोन्ही पक्षातील लोकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक एकमेकांना चप्पलने मारताना दिसत आहेत. एकमेकांना मारण्यासाठी त्यांनी खुर्च्या आणि टेबलचाही वापर केला.

अलप्पुझा येथील मुत्तोम येथील एका विवाह मंडपात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी अलप्पुझा पोलिसांनी 10 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्यांची ओळख पटवली जात आहे.