वायरल झालं जी

बहिणीने कोरोनावर मात केली; तिचं स्वागत करतानाचा तरुणीचा डांन्स व्हिडीओ होतोय व्हायरल

पुणे: भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यात वाढत चाललेला रुग्णांचा आकडा पहाता लॉकडाऊनची घोषणा देखील करण्यात आली होती. सगळीकडे कोरोनाचे रुग्ण वाढतच जात असल्याने सर्वत्र निराशेचं वातावरण असताना पुण्यातील एका तरुणीने आजचा दिवस कसा जगावा याबद्दल चांगला धडा दिला आहे. कोरोनावर मात करत घरी परतणाऱ्या बहिणीचं स्वागत करताना तरुणीने केलेल्या या डान्सचं सगळीकंडं जोरदार कौतुक होत आहे.

 

पुण्यात रुग्णांची संख्या वाढत असताना, कोरोनावर मात करत बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. पुण्याच्या स्वामी समर्थ नगर भागात राहणाऱ्या सातपुते परिवाराने देखील अशीच कोरोनावर मात केली आहे. या कुंटूबातील पाच व्यक्तींना कोरोना झाल्याचे समोर आले होते, परिवारातील एकमेव व्यक्ती सलोनी सतापुते या तरुणीचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला होता. त्यानंतर चांगली गोष्ट अशी की हे सर्व जण पुर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. पण जेव्हा बहिण कोरोनावर मात करुन घरी परतली तेव्हा सलोनीने हटके पध्दतीने तीचं स्वागत केलं होतं. त्या क्षणांचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कोरोना डिस्चार्ज👌👌👌कसला कोरोना आणि कसलं काय…जगायला शिका असे रोग अनेक येतील आणि जातील… प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला शिका.. या व्हिडिओमुळे अनेकांना आज ऊर्जा मिळेल…#CoronavirusPandemic #CoronavirusOutbreak

Posted by E-Chawadi : ई-चावडी on Saturday, July 18, 2020

सलोनीनीने “हटजा रे छोकरे..” या गाण्यावर धम्माल डान्स करत बहिणीचे स्वागत केले.  नंतर या व्हिडीओत दोघी बहिणी डान्स करताना दिसत आहेत. त्यांनंतर आईने औक्षण करत मुलीला घरात घेतले. कोरोना झालेल्या रुग्णांची व्यवस्थीत काळजी घेतल्यास रुग्ण बरे होत आहेत आणि ते आनंदात घरी पोहचत असल्याचा हा दाखला आहे.